32.8 C
Latur
Monday, May 13, 2024
HomeFeaturedमहादेव बेटिंग : साहिल खानला चार दिवसांची पोलीस कोठडी

महादेव बेटिंग : साहिल खानला चार दिवसांची पोलीस कोठडी

ऑनलाइन महादेव बुक बेटिंग प्रकरणातील आरोपी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. साहिल खान यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, अभिनेता साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काल फेटाळला होता. या प्रकरणावर न्यायालयाने म्हटले होते की, संपूर्ण गुन्ह्याचे व्यापक स्वरूप पाहता या प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कारवाई बेकायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात मोठी रक्कम गुंतलेली आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले की, या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट सिमकार्ड आणि बँक खाती वापरली गेली आहेत, त्यामुळे साहिल खानविरुद्ध उपलब्ध पुरावे पाहता त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्याला अटकेतून दिलासा देता येणार नाही.

साहिल खान Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.

या अभिनेत्यावर लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR