31.8 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeमहाराष्ट्रलग्नाच्या स्कूलबसला ट्रकची धडक; ४ ठार

लग्नाच्या स्कूलबसला ट्रकची धडक; ४ ठार

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ येथे जाणा-या पाहुण्यांच्या उभ्या स्कूल बसला राळेगाव-यवतमाळ रोडवरील वाटखेडजवळ ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात ४ जण ठार झाले आहेत. तर ६ जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळच्या लोहारा परिसरात राऊत यांच्या मुलीचे लग्न खैरी येथील अनिकेत ताजने याच्याशी पार पडले. या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ खैरी (ता. राळेगाव) येथे आयोजित करण्यात आला होता. यासाठी पाहुणे स्कूल बसने खैरी येथे गेले होते. पाहुणे रात्री उशिरा परतताना राळेगाव-कळंब मार्गावरील वाटखेड गावाजवळ स्कूल बसचे टायर पंक्चर झाले. दुरुस्तीसाठी हे वाहन थांबल्यानंतर काही पाहुणे खाली उतरले होते. तर काही पाहुणे बसमध्येच बसले होते. पंक्चर काढण्याचे काम सुरू असतानाच ट्रकची स्कूल बसला जोरदार धडक बसली.

अपघात घडल्यानंतर जखमींना उपचारासाठी तत्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र श्रुती गजानन भोयर (१२) परी गजानन भोयर (१०) या दोन सख्ख्या बहिणी, तर लिलाबाई पांढरे(५५) आणि निलेश छापेकर (३५) यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये माया धांदे, छकुली बंधरे, सोनू काफेकर, आर्यन काफेकर, रूणाल बुरांडे, कुणाल काफेकर, शालीनी बुरांडे, नीलेश काफेकर, अक्षय राऊत (सर्व रा. घोन्सी, ता. पांढरकवडा) यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR