27.9 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeलातूरस्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव : माजी मंत्री आ. अमित देशमुख

स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव : माजी मंत्री आ. अमित देशमुख

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्ष जे बोलतो तेच करतो व जो करतो तेच बोलतो. या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने जनतेला गॅरंटी कार्ड दिले आहे. काँग्रेस इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर शेतीमालाला हमीभाव स्वामीनाथन आयोगानुसार देण्यात येणार आहे. तसेच शेतक-यांची कर्जमाफी ही केली जाणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. २८ एप्रिल रोजी दुपारी रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली.

यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, सर्जेराव मोरे, यशवंतराव पाटील, अनंतराव देशमुख, अनुप शेळके, चंद्रचूड चव्हाण, उमाकांत खलंगरे, शेषेराव हाके, प्रमोद जाधव, सुनीता आरळीकर, सोमाणी ताई, लालासाहेब देशमुख, डॉ मस्के, डॉ. बिराजदार, माणिकराव सोमवंशी, रमेश सूर्यवंशी, विश्वासराव देशमुख, डॉ. संजय हरिदास आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी मंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, काँग्रेसचे सरकार असताना पंतप्रधान मनमोहन सिंग, कृषिमंत्री शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. तेव्हा काँग्रेसने ७० हजार कोटीचे कर्जमाफ शेतक-यांचे केले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही उद्योगपतींचे १६ लाख कोटीचे कर्ज माफ केले. काँग्रेस महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार आहे, मनरेगा अंतर्गत मजुरांना दोनशे रुपये मजुरी मिळते त्यांना चारशे रुपये मजुरी देणार आहे, असे हे काँग्रेसचे गॅरंटी कार्ड आहे असे माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR