26 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयकाय ती छाती, काय ती दाढी, आजूबाजूला भ्रष्टाचारी

काय ती छाती, काय ती दाढी, आजूबाजूला भ्रष्टाचारी

सोलापूर : काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सबपे भारी, पण आता आजूबाजूला भ्रष्टाचारी असे म्हणत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर तोफ डागली आहे. प्रणिती शिंदेंना निवडून द्या, समोरच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करून निवडून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी तुम्हाला आमची देशाभिमानी कडवट शिवसेना नकोय, तुम्ही कुणाचा प्रचार करताय, तुम्हाला माहितीय? २०१४ साली आणि २०१९ साली मोदींबद्दल आम्हालाही अभिमान होता. काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सबपे भारी, असे होते. पण आता एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, असे वातावरण आहे. तुम्हाला कुठूनही औदसा सुचली कळत नाही.

कडवट शिवसेना नकोय, भ्रष्टाचारी हवेत
आमच्यासारखे कडवट शिवसैनिक जे देशासाठी, सुशीलकुमार शिंदे तुम्ही बोलले तसे बाळासाहेबांनी नेहमी सांगितले की, आमचे हिंदुत्व आमचे राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपलं मानतो, तो आमचा आहे, अशी शिवसेना यांना नकोय, यांना ही नकली शिवसेना वाटतेय. रविश कुमार यांनी आज टाकलेला व्हीडीओ टाकलाय, भारतातील सर्वात मोठे सेक्स सँकडल, प्रज्वल रेवण्णा, देवे गौडा यांचा नातू त्यांचे यांचे हजारो सेक्स स्कँडल व्हीडीओ व्हायरल झाले आहेत आणि मोदीजी सांगत आहेत, या प्रज्ज्वलला मत दिले, तर माझे हात बळकट होतील. असे तुमचे कळकट हाताचे बळकट हात असे म्हणत ठाकरेंनी जहरी टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या साध्या माणसाने लिहिलेली घटना, मोदीजी तुम्ही बदलायला निघालेला आहात. भाजपात हिंमत असेल, तर ज्या घटनेवर तुम्ही हा ठेवून शपथ घेतला. घटनेवरती हात ठेवून पाहा, संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही. यांना घटना का बदलायचे आहे? कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल आकस आहे, म्हणून महाराष्ट्रातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाही. तुम्ही म्हणून नकली म्हणाला, ती काय तुमची डिग्री नाही.

या शिवसेनाच दणका काय हे चार तारखेला कळेल. राज्यात दुष्काळ आहे, सोलापूर तहानलेला आहे. भाकड जनता पक्षाची नीती ही वापरा आणि फेकून द्या. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं, बाळासाहेबना वचन दिलंय, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, पण अमित शाह यांनी वचन मोडलं. मागील वेळी खासदार कोण होते? ते आता कुठं आहेत, त्यांच्या भक्तांचा वापर केला आणि सोडून दिलं. जात प्रमाणपत्राचा प्रश्न असेल, तर अमरावतीचा काय झालं, यांचाही प्रश्न सोडवायचा होता, अस म्हणत उद्धव ठाकरेंनी अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला आहे.

मोदींनी लस दिली नाही, महाराष्ट्रात लस बनली
मोदींनी लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. मोदीजी काय शास्त्रज्ञ आहेत का? महाराष्ट्रमध्ये लस बनली, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रच्या आरोग्य यंत्रनेने लोकांना लस पोहोचली. मोदीजी लस तुम्ही दिलेली नाही, आमच्या महाराष्ट्रामध्येच ती बनली. लस देण्यासाठी काय काय केले? आम्हाला मागितलं तर म्हणायचे यांना द्यायचे, त्यांना द्यायचे, प्रत्येक वेळी हेच चाळे केले, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR