28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील १७ लाख कुणाला द्यायचा?

ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील १७ लाख कुणाला द्यायचा?

आमदार रवींद्र धंगेकरांचे खळबळजनक आरोप

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी शुक्रवारी विभागीय चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या सर्व घडामोडींवर पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया केली आहे. ललित पाटलाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाला हफ्ते दिले जात होते, ललित पाटील १७ लाख कुणाला द्यायचा? असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘ ललित पाटीलने कालच सांगितले की, मी १७ लाख रुपये देत होतो. ज्यांना ज्यांना पैसे दिले, त्यांची पोलिसांनी चौकशी केली नाही. मी दोन दिवसांपूर्वी तपास अधिका-यांना भेटलो आणि सांगितलं की, आरोपी अधिका-यांकडून रकमेची वसुली करा आणि त्यांना अटक करा.

काल शासनाचा अहवाल आला आणि त्यामध्ये ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केले आहे. पण तो अहवाल एक नौटंकी आहे. संजीव ठाकुरांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे. खरं तर, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, याची मागणी मी वारंवार करत आहे.’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR