36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपळविणा-या उद्योगधंद्याबाबत ५ वर्षांपूर्वी का बोलला नाहीत

पळविणा-या उद्योगधंद्याबाबत ५ वर्षांपूर्वी का बोलला नाहीत

कणकवली : देशात उभी फूट झाली आहे एकतर मोदींच्या बाजूने असाकिंवा विरोधात असा. पण २०१९ मध्ये मी जे बोललो, ते आजच्या विरोधी पक्षांमध्ये बोलण्याची गरज नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोधात गेलो. यांच्यासारखं नाही. मुख्यमंत्रिपद हवं होतं म्हणून विरोध करणारे आहोत, असं माझं नव्हत. भाजपचे अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री दिलं असतं तर आज जे बोलत आहात ते बोललं असतात. काल सांगितले कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत.

वा रे वा २०१४ ते २०१९ या काळात तुम्ही त्यांच्या सोबत होतात. तेव्हा का विरोध केला नाही. कोकणात प्रकल्प आले तर स्फोट होईल म्हणणा-या माहिती नाही का? की अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार असे मनसे अध्यक्ष राजे ठाकरे म्हणाले. भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मी सरळ चालणारा आहे. ठाकरेंचा जेनेटिकली प्रॉबलेम आहे. मला एखादी गोष्ट पटली तर पटली. एखादी नाही पटली तर शेवटपर्यंत पटणार नाही. २०१९ च्या सभेत मी मोदींचा जाहीर विरोध केला. काही गोष्टी नाही पटल्या आजही पटत नाहीत. याबाबत आपण मोकळे असणे गरजे आहे. या गोष्टी पटल्या नाहीत आणि या गोष्टी पटल्या. मग नोटबंदीची असेल पुतळ्यांची असेल. पण ज्या गोष्टी पटल्या त्याचे जाहीर कौतुक करणारा मी आहे. जेव्हा पासून मला राजकारणाची समज आलीकिंवा उमज आली. तेव्हापासून मी पाहातोय आणि वाचतोय. तेव्हापासून सुरु आहे. ३७० कलम रद्द करा. मात्र, मोदींनी हे रद्द केले. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल.

कोण कोण कुठचा बाबर आणि त्याला सांभाळणा-या आपल्याकडच्या औलादी राज ठाकरे म्हणाले, बाबरी मशीदीचा विषय आला. देशभरातून कारसेवक अयोध्येला गेले. तेव्हा दुरदर्शन होते. चॅनेल नव्हते. त्यांना स्लॉट दिले जायचे. तेव्हा तिथे कारसेवकांना ठार मारण्यात आले होते. कोण कोण कुठचा बाबर आणि त्याला सांभाळणा-या आपल्याकडच्या औलादी आहेत. १९९२ साली बाबरीचा ढाचा गेला ती पाडली गेली. १९९२ साली झालेली ती गोष्ट होती. आज राम मंदिराचा पहिला भाग उभा राहिला. रामलल्ला तिथे उभे राहिले. जस काश्मीरचे झाले तसे राम मंदिराचेही झाले. नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे राम मंदिर उभे राहिले. कार सेवकांच्या आत्म्याला शांतता मिळाली. जे चांगले झाले ते झाले. जे वाईट झाले ते वाईट झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR