37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरश्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखान्­याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या प्रचारार्थ विधानसभा मतदारसंघनिहाय महीला मेळावा आणि पंचायत समिती सर्कलनिहाय महीलांच्या बैठकीच्या माध्यमातून हजारो महिलांशी संपर्क साधून, भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीत आणि बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांची उमेदवार निवडीपासून प्रचारात नियोजन दिसून आले आहे. सर्वच प्रचार फेरीत लातूर लोकसभा मतदार संघात डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष आघाडीवर दिसून येत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसचे वारे निर्माण झाले आहे, यामुळे  डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांचा विजय निश्चीत मानला जात आहे.
एकुण मतदाराच्या संख्येकडे पाहता महीलांचे मतदान निर्णायक असून विलास सहकारी साखर कारखान्­याच्या चेअरमन वैशाली ताई विलासराव देशमुख यांच्या बैठकामुळे महीला मतदारांचा काँग्रेस महाविकास आघाडीला प्रतिसाद वाढला आहे. वैशालीताई विलासराव देशमुख यांनी डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ महीला मेळावा निमित्ताने रेणापूर, निलंगा आणि महीलाची पंचायत समिती सर्कलनिहाय बैठक जवळा बु., कासारजवळा, बोरी, भांतागळी, महापूर, एकुर्गा, गातेगाव, पांखरसांगवी, हरंगुळ बु., शिरसी, आखरवाई, गोदेगाव, धानोरी, शिऊर, मुरूड येथे घेतली. या सर्व ठिकाणी महीलांची उपस्थिती चांगली होती. बैठकीतील महीलांशी त्यांनी चर्चा केली. महीला विकासात काँग्रेस पक्षाचे योगदान लोकसभेची निवडणूक माध्यमातून महीला विकासात काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे असल्याचे वैशालीताई विलासराव देशमुख यांनी आर्वजून सांगीतले.
देशातील महीलांना प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी काँग्रेस पक्षाची वाटचाल महत्वाची ठरली आहे. काँग्रेस पक्षाने महीलांच्या शिक्षण, रोजगार, राजकारण आरोग्य, नोकरी, समाजकारण या सर्व क्षेत्रात स्त्रीयांना पुरूषाच्या बरोबरीने संधी दिली. काँग्रेस पक्षाने स्त्री शक्तीचे महत्व ओळखून त्यांच्या सक्ष्मीकरणासाठी विविध कार्यक्रम आणि धोरणांच्या माध्यमातून काम केले. पंचायती राज संस्था आणि नगरपालिका संस्थांमध्ये महिलांसाठी जागा आरक्षित केल्या  यातून राजकीय क्षेत्रात सक्रिय भाग घेण्याची संधी मिळाली.
स्त्री-पुरुष समानतेच्या आधारावरच समाजाची प्रगती शक्य आहे. आजच्या जगात महिलांनी विविध क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था, राजकारण, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात महिलांनी मोठे योगदान दिले आहे. आजही काँग्रेस पक्षाचे महीलासाठी पुरोगामी धोरण असल्याचे आणि देशात सरकार आल्यास आदरणीय सोनीया गांधी, राहूल गांधी, प्रियांका गांधी महीलासाठी नवे क्षितीज खुले करून देतील असे त्यांनी या बैठकांच्या माध्यमातून सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR