24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रलोकशाहीवर विश्वास नसणा-यांसोबत जाणार नाही

लोकशाहीवर विश्वास नसणा-यांसोबत जाणार नाही

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना सोबत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासोबत मी कधीच जाणार नाही असे शरद पवारांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, जे देशाच्या हिताचे नाही त्यात माझे सहकार्य असणार नाही. तर अशा विधानांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थता दिसून येते असेही पुढे शरद पवार म्हणाले आहेत. तर आम्हाला नकली म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवाल देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संसदीय लोकशाही संकटात आहे. त्याचबरोबर आमची विचारधारा ही नेहरू आणि गांधी यांच्या विचाराची आहे असेही शरद पवारांनी पुढे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR