33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्र‘प्रहार जनशक्ती’ महायुतीतून बाहेर पडणार?

‘प्रहार जनशक्ती’ महायुतीतून बाहेर पडणार?

६ एप्रिलला करणार उमेदवाराची घोषणा

अमरावती : प्रतिनिधी
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अशात प्रहार जनशक्ती महायुतीत बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अमरावतीमधील लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण झाला आहे. प्रहार संघटना ६ एप्रिलला आपला उमेदवार घोषित करणार असल्याचे सांगितले जात आहे. या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा इच्छुक आहेत.

अमरावतीच्या जागेसाठी महायुतीमध्ये कलह निर्माण झाला आहे. या जागेवरून खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढायची आहे. तीच इच्छा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केले. यामुळे मतदारसंघाचा तिढा सुटण्यापेक्षा आता वाढताना जास्त दिसतोय.

नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणीत येतोय, असे वाटतेय’’, असेही बच्चू कडू यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. आता थेट उमेदवार घोषित करणार आहे. बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR