कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरणार

धाराशिव : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतक-यांशी संवाद साधत त्यांची व्यथा जाणून घेतली. लातूरसह धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलताना त्यांनी केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून मदत करीत शेतक-यांची कर्जमुक्ती करावी, असे म्हटले. सरकारने संकटग्रस्त शेतक-यांना कर्जमुक्त केले नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतक-यांसोबत शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा सरकारला दिला.

आज सकाळपासून मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागात धावती भेट घेतली. माझ्यासोबत शिवसेनेचे सहकारी आहेत. आपल्या माध्यमातून संकटाची भीषणता सर्वांना कळलेली आहे. मी मराठवाड्यातील जनतेला आणि शेतक-यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्री म्हणाले तसे यात राजकारण आणायचे नाही. सरकारने जाहीर केलेली मदत तूटपुंजी आहे. एकरी साडेतीन ४ हजार मिळत आहेत. नुकसान झाले, त्याची साफसफाई करायला गेले तर त्याच्या दुप्पट खर्च येणार आहे, म्हणजे सरकार शेतक-यांची थट्टा करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

मुसळधार पावसामुळे जमीन खरडून गेली, पीक सडून गेले, घरे-दारे वाहून गेली, गुरे वाहून गेली, शेळ््या-मेंढ्या वाहून गेल्या. एकूणच शेती, शेतकरी आणि आजुबाजूला राहणा-या नागरिकांचे आयुष्यच वाहून गेले, असे ठाकरे म्हणाले. सरसकट कर्जमाफीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी तुमची योग्य वेळ कधी येणार आहे. पंचांग बघून, मुहूर्त काढून सांगणार आहात का, शेतक-यांना सरसकट कर्जमुक्ती दिली पाहिजे, आम्ही शेतक-यांसोबत आहोत. ती मागणी पूर्ण न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.

पंजाबप्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपये द्या
उद्धव ठाकरे यांनी पंजाब राज्यात काही दिवसांपूर्वी असे संकट आले, त्यावेळी तेथील आप सरकारने शेतक-यांना कालबद्ध मर्यादेत मदत जाहीर केली, ती हेक्टरी ५० हजार रुपये. पंजाब सरकार देत असेल तर महाराष्ट्र सरकारने द्यायला काही हरकत नाही.

नुकसान पाहता मदत तुटपंजी
जमीनच वाहून गेली आहे तर शेतकरी किती अडचणीत आला आहे, याची जाणीव सरकारने ठेवावी. आता शेतक-यांना जगण्यासाठी मोठी मदत आणि कर्जमाफीची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. दुष्काळी भागात प्रथमच अतिवृष्टी झाली. त्यामुळे पूरपरिस्थितीचे मोठे संकट कोसळले. सरकारची मदत २०२३ च्या निकषांप्रमाणे असून नुकसान पाहता जाहीर केलेली मदत तुटपंजी आहे, अशा शब्दांत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्र्यांनी आमच्या समस्या ऐकल्या नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर येऊन गेले. त्यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परंतु ते आले आणि निघून गेले, त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत, अशा शब्दांत शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली.

अजित पवार यांची ही मस्ती
लाडक्या बहिणींसाठी ४५ हजार कोटी खर्च करत आहोत, असे अजित पवार म्हणाले ही मस्ती आहे. त्यातील घोटाळे बाहेर येत आहेत, तो वेगळा भाग झाला. लाडक्या बहिणीच्या घरी १५०० रुपये दिले जातात. एवढ्या पैशांत त्या बहिणीचे घर सावरणार आहे का, याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

लातूर जिल्ह्यातही केली पाहणी
गेल्या २ दिवसांपासून राज्याचे मंत्रिमंडळ मराठवाडा दौ-यावर असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला व शेतक-यांना बांधावर जाऊन दिलासा दिला. मराठवाडा दौ-यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर जिल्ह्यातील काटगाव आणि तांदुळजा येथील शेतक-यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतली आणि आपल्या हाती काही नाही. मात्र, धीर देण्यासाठी आलो असल्याचे सांगत खचू नका, वेडवाकडे पाऊल उचलू नका, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो, अशी साद त्यांनी घातली.

उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर धाराशिवसाठी रवाना झाले. लातूरमधील काटगावमध्ये आणि तांदूळजामध्ये शेतक-यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर साहेब आमची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी आपल्याला मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खा. संजय राऊत, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|पाणीपुरी खाल्ली आणि १६ जण रुग्णालयात; कंधार हादरला!
01:15
Video thumbnail
Latur|मान्सूनपूर्व कामांचा दावा हवेत; पहिल्याच पावसात लातूर जलमय
02:33
Video thumbnail
Latur Manapa|लातूर मनपा ठप्प! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा नागरिकांना फटका
01:58
Video thumbnail
Udgir Farmer Andolan|हातात नांगर, सरकारविरोधात एल्गार; उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा सत्याग्रह!
03:10
Video thumbnail
Latur|रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात हरंगुळ येथील नागरिक आक्रमक;बांधकाम विभागासमोर अर्धनग्न आंदोलन
02:29
Video thumbnail
Latur Manpa Andolan|दोन महिन्यांपासून पगार नाही; मनपा कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
04:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये 'नाते शतजन्माचे'; परिचय संमेलनाला मोठा प्रतिसाद!
03:08
Video thumbnail
Latur|TET पेपरफुटीवर उदगीरमध्ये अभाविपचा एल्गार; सरकारविरोधात जोरदार आंदोलन!
02:30
Video thumbnail
अयोध्या राम मंदिर प्रकरणात दोषींना सोडलं जाणार नाही - केंद्रीय मंत्री चिराग पासवान
01:31
Video thumbnail
Udhav Thakre sabha|परभणीत उद्धव ठाकरेंचा एल्गार; बंडखोरांवर थेट हल्लाबोल!
05:46
Video thumbnail
Hingoli|कृषिमंत्र्याच्या प्रतिमेला पैशाचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
00:57
Video thumbnail
Sanjay Jadhav On Sanjay Raut|"हम तो इतने बेशरम हैं..." म्हणत जाधवांचा राऊतांवर निशाणा
04:28
Video thumbnail
Rain Update|लातूरमध्ये मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा
02:33
Video thumbnail
Latur Railway Update|खासदार शिवाजी काळगे यांचा मोठा दावा; लवकरच नवी लातूर–मुंबई रेल्वे
02:16
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01

Latest news