21.4 C
Latur
Friday, February 6, 2026
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये स्पा सेंटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

केरळमध्ये स्पा सेंटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

वसुलीत ५० हजार देण्यास नकार दिला होता

तिरुवनंतपुरम : केरळमधील तिरुवल्ला येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, सहा जणांनी हा गुन्हा केला. ही घटना १ फेब्रुवारी रोजी घडली.

पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी सुबिन त्याच्या साथीदारांसह १ फेब्रुवारी रोजी परिसरातील एका वेलनेस स्पा सेंटरमध्ये आला. तिला चाकूने धमकावत त्यांनी ५०,००० रुपयांची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर सुबिन आणि त्याच्या साथीदारांनी तिला दुस-या खोलीत ओढले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. आरोपींनी तिथे उपस्थित असलेल्या एका ग्राहकाशीही गैरवर्तन केले. त्यांनी दुस-या स्पा कर्मचा-याकडून २५०० रुपये हिसकावून घेतले.

सुबिन सराईत गुन्हेगार
घटनेवर पोलिसांचे म्हणणे आहे की, मुख्य आरोपी सुबिन सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत. सामूहिक बलात्कार प्रकरणात आम्ही तीन आरोपींना अटक केली आहे. सुबिनलाही अटक करण्यात आली आहे. इतर तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR