Homeराष्ट्रीयघोषणाबाजीनंतर लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब

घोषणाबाजीनंतर लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब

लोकसभेत गोंधळ, राडा सुरूच

नवी दिल्ली : शुक्रवारीही लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी पाहायला मिळाली. पहिल्यांदाच कामकाज फक्त तीन मिनिटे चालले आणि दुुस-यांदा सात मिनिटे चालले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज ९ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही ९ फेब्रवारीपर्यंत तहकूब करण्यात आले.

केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले की, काल सर्वांनी त्यांना बालक म्हटले. आज पंतप्रधानांची शाळा होती, जिथे मुलांना यशस्वी होण्याचे सांगितले जात होते. जर राहुल पंतप्रधानांच्या शाळेत गेले तर ते आयुष्यात यशस्वी होतील. गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला. २००४ नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय लोकसभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR