31.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरमहिलांनी संकटांना न डगमगता यशस्वी वाटचाल करावी : यन्नम

महिलांनी संकटांना न डगमगता यशस्वी वाटचाल करावी : यन्नम

सोलापूर – महिलांनी कोणत्याही संकटांना न घाबरता त्यावर मात करीत यशस्वी वाटचाल करावी. कोणत्याही परिस्थितीत उज्वल यश संपादन करावे, असे आवाहन माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिक तसेच सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रभात शिक्षण मंडळ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अख्तरबानो शेख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिक चे अध्यक्ष शब्बीर शेख ,बालभारती प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रिजवान शेख ,बालभारती माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इम्तियाज मुल्ला उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी महापौर यन्नम, डॉ. सुषमा संभारंभ , मुख्याध्यापिका जि प प्राथमिक शाळा विडी घरकुल फिरोजा इरकल , डॉ. लक्ष्मी बळी , पोलीस कर्मचारी दिपाली बोरामणीकर , पहिली महिला रिक्षा चालक शोभा घंटे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यन्नम यांनी मुलींनी शिकावे आणि पुढे जावे असे आवाहन केले. अतिथी लायन्स क्लबचे अध्यक्ष शब्बीर शेख यांनी प्रत्येक क्षेत्रात मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत व आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अनिस शेख यांनी केले तर आभार रिजवान शेख यांनी मानले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR