आईची हत्या करून मुलाने स्वत:चे जीवन संपवले

नांदेड : प्रतिनिधी
शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. एका २६ वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची क्रिकेट बॅट आणि लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली, आणि त्यानंतर दुस-या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली
.
राहुल कॉलनीतील चौथरे कुटुंबात शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रतीक चौथरे (वय २६ ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्या ५० वर्षीय आईचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. मुलाने आईची हत्या का केली याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रतीकने रागाच्या भरात घरात असलेली क्रिकेटची बॅट आणि लोखंडी रॉडने आईवर भीषण हल्ला चढवला. डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार झाल्यामुळे आई रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच प्रतीकने दुस-या खोलीत जाऊन छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

शेजा-यांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस
रात्रीच्या वेळी घरातून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आवाज येत असल्याने शेजा-यांना काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली. त्यांनी तातडीने धाव घेऊन घराची खिडकी फोडून आत पाहिले असता, एका खोलीत आईचा रक्ताळलेला मृतदेह आणि दुस-या खोलीत प्रतीक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. शेजा-यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले व ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. घटनेच्या वेळी प्रतीकचे वडील नोकरीनिमित्त शहराबाहेर गेलेले होते. मुलाने आपल्या आईची एवढ्या क्रूरपणे हत्या का केली आणि स्वत: आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news