रेणापूर : प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून गोरगरीब व गरजू जनतेची निस्वार्थ भावनेने सेवा करणा-या रेणापूर येथील सेवानिवृत्त शिक्षीका श्रीमती उषाताई मिठाराम राठोड यांना महाराष्ट्र पोलिस मित्र सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते शनिवार दि. २७ जून प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास शिक्षक आ. विक्रम काळे, माजी खा. डॉ सुनिल गायकवाड, सिने अभिनेत्री मैथेली वारंग, सुफी सम्यद शमशोद्दीन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्कार’श्रीमती उषाताई मिठाराम राठोड यांना देण्यात आला. श्रीमती उषाताई राठोड यांनी शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्य करीत असतान सामाजिक सलोखा, समाजसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. ती आजही कायम आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. सत्कारावेळी राठोड कुटुंबीय उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती राठोड यांचे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
















