एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना, केंद्र सरकारने रविवारी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात थेट २९ रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या घरातील किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. ही दरवाढ १४.२ किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली असून, गेल्या तीन महिन्यांत घरगुती गॅसच्या किमतीत झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे.

या दरवाढीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, सातत्याने हे दर वाढवतायेत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असे सांगितले. पण, नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधा-यांना योग्य वेळी कळेल, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, या नव्या दरवाढीनंतर आता राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून थेट ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. तर देशातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतही २९ रुपयांचीच वाढ झाली असून, मुंबईतील दर ९१२.५० रुपयांवरून ९४१.५० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अगोदरच मेटाकुटीला आला असताना, आता गॅस सिलेंडरच्या दरांनी गरिबांचे कंबरडे मोडले आहे.

आणखी दरवाढीची भीती
एलपीजी गॅसचे उत्पादन करणा-या सरकारी तेल कंपन्या अजूनही प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे ७०३ रुपयांचा तोटा सहन करत आहेत. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती बाजार तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वीच १ जून रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या दरात ४२ रुपयांची वाढ केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे दर तब्बल दुप्पट झाले आहेत. त्यातच आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाईचा हा भडका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41

Latest news