‘एसआयआर’ मोहीम यशस्वी करावी

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत  दि. २२ जुलै रोजी  दुपारी  लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार  यादी विशेष पडताळणी मोहीम (एसआयआर) आढावा बैठक झाली. या बैठकीत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी एसआयआर मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन केले.
यावेळी लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अँड. स्नेहल उटगे, लातूर  जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ.शिवाजी जवळगेकर, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, मनपातील सभागृह नेते विजयकुमार साबदे, परिवहन समितीचे सभापती फैजल  कायमखानी, विलास को आपरेटिव्ह बँकेचे चेअरमन  किरण जाधव, व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, माजी महापौर दीपक सुळ, निलेश देशमुख, विद्याताई पाटील, विष्णुदास धायगुडे, डॉ. दिनेश नवगिरे, गणेश एसआर देशमुख, एकनाथ पाटील, मोईनउल्ला सय्यद, सिराज शेख, आसिफ बागवान, युनूस मोमीन, सपना किसवे, विजय टाकेकर, तनुजा कांबळे, संजय ओहाळ, असलम चाऊस, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, बब्रुवान गायकवाड आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, ग्राम अध्यक्ष, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मतदार  यादी विशेष पडताळणी मोहीम (एसआयआर) समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया आहे. हा अधिकार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाला मतदाराचा हक्क मिळणे आवश्यक आहे, असे सांगून एकही पात्र मतदार मतदान यादीतून वगळला जाणार नाही, यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, विशेष करून बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी सजग राहून, निवडणूक विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांना सहकार्य करावे, घरोघरी जाऊन नागरिकांना मतदान नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, या कामी त्यांना येणा-या अडचणी दूर कराव्यात, असे आवाहन यावेळी बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
प्रारंभी या आढावा बैठकीत माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बूथस्थरावरील कार्यकर्त्याकडून सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली. माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले आज सकाळी शासकीय अधिकारी यांच्याशी एसआयआरबाबत मी चर्चा केली  त्यातून धक्कादायक माहिती माझ्यासमोर आली आहे. ज्या गांभीर्याने मतदारांनी एसआयआर मोहिमेला घ्यायला पाहिजे त्या गांभीर्याने ते घेत नाहीत. जे निवडणूक लढवणार आहेत त्यांनी या मोहिमेला गांभीर्याने घ्यावे मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेता कामा नये जी मतदार यादी तयार होणार आहे ती काळजीपूर्वक झाली पाहिजे मतदाराचा मतदानाचा अधिकार संपुष्टात येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी एसआय आरचा सर्व निवडणुकीत प्रभाव पडेल.एसआयआरचे म्हणावे तेवढे काम झाले नाही प्रत्येक प्रभागात डोर टू डोर कामपेन् करावे मतदार यादीत नाव नसेल तर पुढे नागरिकाला अनेक अडचणी  अडचणी येतिल महानगरपालिकेने मनपा क्षेत्रीय  अधिकारी, मालमत्ताधारक यांच्या माध्यमातून एसआयआर बाबत काम करावे महापौर
उपमहापौर यांनी याबाबत आढावा घ्यावा, अशी सूचना  त्यांणी केली. या बैठकीचे प्रास्ताविक डॉ. दिनेश नवगिरे यांनी  करून एसआयआर मोहिमेबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम: पूर्णा शहरात 'देववन-घनवन' प्रकल्पांतर्गत २,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
05:14
Video thumbnail
मंगरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; रुग्णवाहिकेचेही लोकार्पण
02:56
Video thumbnail
Nanded Congress Protest|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद नांदेडमध्ये; काँग्रेस रस्त्यावर
01:29
Video thumbnail
Amit Deshmukh|भारतात आता लोकशाही फक्त नावालाच!’ आ.अमित देशमुखांचा भाजपवर पलटवार
01:56
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|जयंतीदिनीही एकच सवाल... अजितदादांच्या मृत्यूमागचं गूढ कधी उकलणार?
01:19
Video thumbnail
Nanded|नरसीत घराला आग दीड लाख रकमेसह अडीच लाखाचे साहित्य जळून खाक
00:50
Video thumbnail
Latur|धक्कादायक!चाकुर पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
04:28
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|दादांच्या आठवणींना उजाळा; सुनेत्रावहिनी पवार आणि जय पवार भावूक
00:40
Video thumbnail
Latur|भिंतींवर पिचकाऱ्या, दुर्गंधी अन् घाण; लातूरच्या प्रशासकीय इमारतीचा श्वास कोंडला
03:17
Video thumbnail
Latur|पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
01:18
Video thumbnail
Parbhani|परभणीतील लक्ष्मी नगरात चारचाकीतून गाईची चोरी;घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
02:59
Video thumbnail
Latur|10 वर्षे विना वेतन सेवा; तीन शिक्षकांचे 24 दिवसांपासून उपोषण
03:16
Video thumbnail
Latur|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद उदगीरमध्ये; बहुजन विकास अभियान रस्त्यावर
02:32
Video thumbnail
Latur|स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर सर्वरोग निदान शिबिर
02:32
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07

Latest news