८३ पक्ष सचिवांची नियुक्ती, राज्यात ४ सचिवांची नियुक्ती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सचिव पदांच्या नियुक्त्या काँग्रेसने आज जाहीर केल्या. देशभरातील राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना तेलंगणा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली. महाराष्ट्राचे सचिव म्हणून यु. बी. व्यंकटेश, रेहान चिस्ती, योगींदर योगी आणि एफ जक्कापणवार यांची नियुक्ती झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार या सचिवांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
काँग्रेसने आपल्या संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल केले असून आपल्या संघटनेतील एकूण ८३ सचिवांची नियुक्ती जाहीर केली आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठीची ही यादी आहे. या यादीत महाराष्ट्राचे सचिव म्हणून यु. बी. व्यंकटेश, रेहान चिस्ती, योगींदर योगी आणि एफ जक्कापणवार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सचिन सावंत यांना तेलंगणा राज्याची जबाबदारी दिली आहे तर रवींद दळवी यांना पंजाब राज्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्त्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केल्या आहेत. या सचिवांच्या मुलाखती स्वत: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतल्या होत्या, असे म्हटले जात आहे.
सचिन सावंत, मोहन जोशींवर मोठी जबाबदारी
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांची तेलंगणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, रामकिशन ओझा यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. मोहन जोशी यांची कर्नाटकचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र दळवी आणि सुरज सिंह ठाकूर यांच्याकडे पंजाबची जबाबदारी आहे. नितीन कुंभलकर यांची कोष विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
















