Homeराष्ट्रीयकेशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग

केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग

वाराणसी : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेलिकॉप्टर अपघतातून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री मौर्य यांनी कौशाम्बीसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे औमासीच्या विमानतळाव त्यांना हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

मिळालेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री लखनौच्या ला मार्टस् मैदानावरून कौशाम्बीसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये अचानक धुराचे लोट येऊ लागले आणि डिस्प्ले सिस्टम बंद पडली, ज्यामुळे विमानातील लोकांमध्ये एकच घबराट पसरली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR