‘कोणी नाना देता का आमचा नाना.. आमच्या या पोरक्या झालेल्या कलाविश्वाला’?

लातूर : प्रतिनिधी
सिने, नाट्य क्षेत्रातील क्रांतीवीर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. सकाळी झोपेतून उठताच ही मनाला वेदना देणारी बातमी सर्वांना कळली. लातूरच्या नाट्य क्षेत्रावर शोककळा पसरली. अनेक नाट्यकर्मींनी आपल्या शोकभावना व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर खूप वेगवेगळे पैलू आणि आयाम असलेले व्यक्तिमत्व या निष्ठुर काळाने आपल्यातून हिरावून घेतले. करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वातील एक समर्थ, संवेदनशील आणि सच्चा कलावंत आपण गमावून ‘कोणी नाना देता का आमचा नाना..? आमच्या या पोरक्या झालेल्या कलाविश्वाला ङ्घ’ असं म्हणत त्या नटसम्राटचीच नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहोत.
रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या असामान्य अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वातील एक समर्थ, संवेदनशील आणि सच्चा कलावंत हरपला आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, संवादफेक, आवाजातील धार , तेवढाच थरार आणि प्रत्येक व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतण्याची विलक्षण ताकद यामुळे त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप होती. स्वत:च्या पायांवर उभं राहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या तरुणालाही चारचौघांसारखाच संघर्ष करावा लागला.
त्यावेळी नाना पाटेकर यांचे पाय मराठी नाटकाकडे वळले. विजय तेंडुलकर लिखित आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित ‘पाहिजे जातीचे ‘ या नाटकातील ‘बबन्या’ ही छोटी भूमिका साकारून त्यांनी मराठी रंगभूमीचे लक्ष वेधून घेतले. जेष्ठ दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांच्या ‘हमीदाबाईची कोठी’  या नाटकातील ‘सत्तार’ ही भूमिकाही त्यांनी अस्सलपणे रंगविली.   आणि त्यांना त्या काळात ख-या अर्थाने नाव, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली जेष्ठ नाटककार जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ या नाटकातून.  लिंगपिसाट , पातळयंत्री आणि थंड रक्ताचा क्रूरकर्मा ‘गुलाबराव’  त्यांनी इतक्या वेगळ्या पद्धतीने साकारला की हा ‘नाना’ पाहताना अंगावर काटा यायचा.  प्रेमानंद गजवी यांचे ‘तनमाजोरीस’ हे नाटक तसे प्रायोगिक. पण या नाटकाला व्यावसायिक स्वरूप देऊन हे नाटक रंगभूमीवर बरेच चालले ते त्यातील नाना पाटेकर यांच्या मालकाच्या अफलातून भूमिकेमुळे.  याच काळात समग्र मराठी रंगभूमीला नवे भान येत होते , तिने वेगळे वळण घेतले आणि मराठी नाटक अनेकपटीने प्रगल्भ झाले.  या प्रवाहात असलेल्या त्यावेळीच्या मंडळीत नाना पाटेकरही आपले योगदान नोंदवित होते.  पुढे माफीचा साक्षीदार वगैरे चित्रपटातून नाना पाटेकर यांनी आपले पाय खंबीरपणे रुपेरी पडद्यावर रोवायला सुरुवात केली.  अशा चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे प्रचलित असलेली अभिनयाची संकल्पनाच त्यांनी बदलवून टाकली. परिंदामधील क्रूरकर्मा गडद रंगात रंगविणारा नाना आम्हाला ‘ थोडासा रुमानी हो जाय ‘ मध्ये कवीमनाचा कलंदर होऊन जगण्याचे सोपे तत्त्वज्ञान रस्तोरस्ती वाटत भटकंती करताना दिसतो. तर वेलकममधला ‘कंट्रोल’  म्हणत प्रेक्षकांचे खळखळून हसणे अनकंट्रोल करणारा शेट्टी आठवण आली तरी चेह-यावर हसू आणतो. नटसम्राटमध्ये रडवणारे अप्पासाहेब बेलवलकर पार काळजात रुतून बसतात. या सगळ्या  भूमिका आठवताना अभिनयातील वैविध्य काय असते याचा खूप मोठा अभ्यास जाणकारांसाठी असतो.
‘नाम ‘सारखी एक मोठी चळवळ उभारून लोकांना कायम भेडसावणा-या समस्यांवर त्यांनी काम करायला सुरुवात केली. यानिमित्ताने नाना आणि मकरंद अनासपुरे यांनी लोकांचा खूप मोठा सहभाग  या चळवळीत वाढवला. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचे शिक्षण, त्यांच्या विधवांना आर्थिक मदत, अशा अनेक विधायक कामासाठीचा नाना पाटेकर यांचा पुढाकार कायम राहिला आहे. कोणाचीही भीडभाड न ठेवता परखडपणे आपले मत मांडणारे स्पष्टवक्ते नाना पाटेकर यांचे भाषण तर औतुसूक्याचा विषय राहिला आहे.   शास्त्रीय संगीतावर खूप प्रेम असलेला हा रसिक श्रोता पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात घोंगडं पांघरून आपली ओळख दडवून शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेत कुठल्या तरी कोप-यात जाऊन बसायचा. या अफाट व्यक्तिमत्वाला आमच्या नाट्य चळवळीच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली.
बाळकृष्ण धायगुडे,
ज्येष्ठ नाट्य अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, लातूर

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news