लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेने यशवंत पंचायत राज अभियानात व इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यात नावलौकीक मिळविला होता. मात्र गेल्या कांही दिवसापासून जिल्हा परिषदेच्या कणा असलेले प्रशासन सध्या कुचकामी झाले आहे. हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावर यांच्या अर्जाचा विषय असेल अथवा नुकताच बांधकाम विभागाचा प्रभारी पदभार देण्याचा विषय असेल या संदर्भाने प्रशासनाच्या कामातील दिरंगाई प्रकर्षाने जानवत आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुभाष कुलकर्णी हे दि. १ ते ८ ऑक्टोबर रोजी रजेवर जाणार असल्याने त्या संदर्भाने दुस-या अधिका-यांकडे तात्पुरता पदभार देण्यासाठी दि. २२ सप्टेंबर रोजी फाईलचा ऑफलाईन व ऑनलाईन दोन पध्दतीने प्रवास सुरू झाला. या फाईलवर मुख्यकार्यकारी अधिकारी यांची दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता सही होऊन पदभार देण्याचा आदेश पारीत झाल. अशी गतीमानता लातूरच्या प्रशासनातील व ई-ऑफीस प्रणालीची आहे. शेवटच्या दिवशी दि. ८ ऑक्टोबर रोजी संबंधीत अधिका-यांने पदभार घेवून काम सुरू केले.
















