तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत चिंतामणी विद्यालय संघ सलग चौथ्यांदा विजेता

पाथरी : येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत प. पु. चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालय गुंज खुर्दच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सलग चौथ्या वर्षी विजेतेपद पटकावून आपल्या विजयी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात चिंतामणी विद्यालयाच्या संघाने जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा संघाविरुद्ध दमदार खेळ करत शानदार विजय मिळवला. या विजयामुळे चिंतामणी विद्यालयाच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. विजयी खेळाडूंना स्पोर्ट्स किट प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष परमानंद मोदानी, सचिव रामबल्लभ पोरवाल, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. पाथरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड, तालुका क्रीडा समन्वयक तुकाराम शेळके, केंद्रप्रमुख सलीम शेख यांनीही संघाचे कौतूक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरी, देशमुख, कदम, काळे, वीरकर, कारेगावकर, दुगाने, पवार, वाघ सर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

क्रीडा क्षेत्रातील या उल्लेखनीय यशामुळे गुंज खुर्द परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. या यशामागे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे प्रोत्साहन आणि संस्थेचे सातत्यपूर्ण पाठबळ असल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. चिंतामणी विद्यालयाचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी| Ekmat Digital
28:13
Video thumbnail
Latur|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
02:12
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29

Latest news