बोरी : जिंतूर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेतील ३ विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करून चमकल्या आहेत. वेगवेगळ्या वजनी गटातील कुस्ती स्पर्धेत या ३ विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या तिन्ही विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत दिव्या दिपक राठोडने ३३ किलो वजनी गटात प्रथम, जान्हवी मुंजाजी कंठाळेने ४२ किलो वजनी गटात प्रथम, संस्कृती दीपक ढाले हिने ४६ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत चमकदार कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे, क्रीडा मार्गदर्शक शेख शाहरुख, मुख्याध्यापक प्रविण राजंवण, क्रीडा शिक्षक भीमाजी सोन्ने यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद, पत्रकार, व्यापारी व गावातील नागरिकांनी विजयी विद्यार्थिनींचे जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेतील यशामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
















