निलंगा तालुक्यात औषध व्यावसायिकांचा कडकडीत बंद

निलंगा : प्रतिनिधी
ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट संघटनेने एक दिवसीय संप पुकारला होता. यात निलंगा तालुक्यातील सर्वच औषधी व्यवसायीकानी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून केंद्र सरकारकडे आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
    देशात ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात औषध विक्री केली जात आहे. यात नकली औषध विकली जात आहेत. शिवाय कॉर्पोरेट कंपन्या ऑनलाईन व्यवसाय क्षेत्रात उतरल्याने भारतीय औषधी व्यवसाय अडचणीत आला आहे. ऑनलाईन औषध विक्रीने सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. औषधी फार्मासीस्टच्या देखरेखीखाली विकली जावीत असा कायदा आहे पण ऑनलाईन विक्रीतून कायदा मोडला जात आहे. या अशा जिवघेण्या ऑनलाईन विक्रीस बंदी घालावी.  कोरोना काळात केलेली औषधाबाबतचे कायदे रद्द करावे यासह अन्य मागणी यासाठी  दि २० मे २०२६  रोजी केमिस्ट संघटनेने भारत बंद पुकारला होता. या बंदमध्ये निलंगा शहर व तालुक्यातील तब्बल २५० केमिस्ट बांधवांनी आपली व्यावसायिक दुकाने पूर्णपणे बंद ठेवून संपात सहभाग नोंदवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज  चौकात एकत्रित येत छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली.
केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना आपल्या मागण्यांचे  निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ओम बाहेती, तालुकाध्यक्ष बालाजी थेटे, उपाध्यक्ष सोमनाथ आगरे, उपाध्यक्ष वैभव पाटील, सचिव राजेंद्र धुत, बाबुराव महाजन, हंसराज शिंदे, विकास साळुंके, मनोज पाटील, दत्ता पाटील, किशन बाहेती, भाग्यश्री मांजरीकर, सुप्रिया नाईकवाडे, कालिदास पाटील, प्रमोद जाधव, भगवान लड्डा, भगवान बोलसुर, विशाल नेलवाडे, सचिन जगताप, अजय पेठकर, हर्षवर्धन सातपुते, अभिषेक गडीकर, अजिम बागवान, खादीम जिय्या असिम पांढरे, नागेश चव्हाण, जेठ्ठी अनिल शेखर पौळ, प्रवीण वाघमारे, सतिश चाकोते, अमर तांदळे, प्रसाद चव्हाण, शुभम कांबळे, राजेश घायाळ आदी उपस्थित होते.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news