नोकरीचे आमिष दाखवून शिक्षिकेचे धर्मांतर

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
नाशिकमधील ‘कॉर्पोरेट धर्मांतर’ प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगरातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुबईमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका खासगी शिक्षकाने ४३ वर्षीय विवाहित शिक्षिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे धर्मांतर करून महिलेवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर आरोपी महिलेचे पैसे, दागिने घेऊन पळाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. त्याच शाळेत आरोपी हुसेन अबु सोयदान (वय ४५) शिक्षक म्हणून काम करत होता. एकाच ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे दोघांमध्ये ओळख झाली आणि त्यातून मैत्री वाढली. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने पीडितेला परदेशात नोकरीची संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेला तिच्या पतीपासून दूर जाण्यास प्रवृत्त केले. तसेच तिच्याशी लग्न करून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करत तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर शहरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुबईत नोकरी मिळवण्यासाठी धर्मांतर आवश्यक असल्याचे सांगून आरोपीने तिच्यावर दबाव टाकला. तिचे मनपरिवर्तन करून तिला धार्मिक विधी आणि कलमा पठण करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने कारणे सांगून पीडितेकडून मोठी रक्कम उकळली. ऑनलाईन व्यवहारांसह रोख रक्कम आणि सुमारे सहा तोळे सोने घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, पैसे आणि दागिने मिळाल्यानंतर आरोपीने संपर्क तोडल्याचा आरोप आहे. १ जूनपासून त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याचे तक्रारदार महिलेने सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद क-हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55

Latest news