पीक विम्यासाठी विमा कंपनीच्या अधिका-याला घेराव

लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांतील एकही शेतक-याला खरीप २०२५ चा पीक विमा अद्यापही मिळाला नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ येत आहेत. शेतक-यांना पेरणीसाठी पैशांची गरज आहे. अशा वेळी पीक विमा मिळाला तर शेतक-यांना आधार मिळेल. परंतू, अद्यापही पीक विमा मिळाला नसल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेने दि. १८ मे रोजी थेट आयसीआयसीआय लोेंबार्ड इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन कंपनीच्या अधिका-यांना घेराव घातला. येत्या आठ दिवसांत पीक विमा शेतक-यांच्या खात्यावर जमा नाही झाल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा यावेळी देण्यात
आला.
लातूर जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ७३९ एवढे खातेदार शेतकरी आहेत. ४ लाख ५४ हजार ४०० हेक्टर क्षेत्र होते. खरीप-२०२५ च्या पीक विम्यासाठी ७ लाख १२ हजार शेतक-यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले होते. परंतू, या कंपनीने पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाचे वजन मीसमॅच झाले, रँडम नंबर योग्य वापरला नाही, प्लॉट चुकीचे निवडले, मळणी व्यवस्थित केली नाही, चुकीचे वजन घेतले, पीक कापणी प्रयोग झाले तिथे पीकच नव्हते, असे थातूरमातूर, बालीश आणि बोगस कारणे देत लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप-२०२५ चा पीक विमा नाकारला आहे.
सत्ताधा-यांनीही शेतक-यांना आधार दिला नाही. त्यामुळे सत्ताधा-यांविरोधात शेतक-यांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. अतिवृष्टी, गारपीठ, पुर, दुष्काळ, बोगस बियाणे, खत, बी-बियाणे, खतांच्या वाढत्या किंमती, खतांचा तुटवडा, शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव या ना त्या कारणाने शेतकरी सदैव अडचणीत असताना विमा कंपनीनेही शेतक-यांना  अडचणीत आणले आहे आणि सरकार म्हणून सत्ताधा-यांनी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. या सर्वांमुळे हताश झालेला शेतकरी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेत आहेत.
आयसीआयसीआय लोेंबार्ड इन्शुरन्स कंपनीने शेतक-यांच्या विरोधात जिल्हा समितीकडे अपिल केले होते. ते अपिल जिल्हा समितीने फेटाळले. त्यानंतर या कंपनीने राज्य तांत्रिक समितीकडे अपिल केले. या समितीनेही विमा कंपनीचे अपिल फेटाळून लावले. दरम्यान १३ मे रोजी मुंबई मंत्रालयात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कृषी आयुक्त, कृषी विभागाचे सचिव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर यांची बैठक घेतली. या बैठकीत विमा कंपनीने केंद्रीय समितीकडे अपिल करणार नसल्याचे आश्वासन देत येत्या आठ दिवसांत लातूर जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन कृषी मंत्र्यांना दिले. त्यामुळे पीक विम्याबाबत शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु, गेल्या ८ दिवसांत पीक विमाच्या संदर्भात आयसीआयसीआय लोेंबार्ड इन्शुरन्स कंपनीने कसलीही हालचाल केली नसल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे, आयुब मुजावर यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन अधिका-यांना घेराव घातला.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45

Latest news