प्रलंबित वेतनवाढ प्रश्नावर तीव्र लढा उभारणार

परभणी : न्यायालयीन कर्मचा-यांच्या प्रलंबित वेतनवाढीच्या प्रश्नावर आरपारची लढाई लढण्यासाठी परभणी जिल्ह्यातील चारही न्यायालयीन कर्मचारी संघटना आणि सेवानिवृत्त कर्मचारी संघाने रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक एकजूट दाखवली. अभी नही, तो कभी नही या आक्रमक घोषणेसह आयोजित केलेल्या या विशेष संयुक्त बैठकीत आंदोलनाचा पहिला टप्प्यात १६ सप्टेंबर रोजी काळी फीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील येलदरकर कॉलनी येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात प्रचंड उत्साहात आणि शेकडो कर्मचा-यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना (गट-क) चे अध्यक्ष अमृत कदम यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या पहिला टप्प्यात १६ सप्टेंबर रोजी होणा-या काळी फीत लावून कामकाज आंदोलनात करावे आणि शासनाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन केले. या पहिल्या टप्प्यात सर्वांनी १०० टक्के सहभाग नोंदवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

राज्य महासंघाचे सचिव विनोद पाथरकर यांनी समान काम, समान वेतन या विषयावर मार्गदर्शन करत एक कर्मचारी, एक आवाज, एकजूट आपली ताकद! असा बुलंद नारा दिला. निवृत्त न्यायालय कर्मचारी संघाचे पदाधिकारी सुनील मुदगलकर यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. यासोबतच मोहनराव कुलकर्णी, गोपाळ टाक, सचिन गौंडगावकर, अशोक सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करून या लढ्याला बळ दिले.

अमृत कदम, शिवराज रगटे, लिंबाजीराव गरुड आणि विजय कदम यांच्या एकत्रित पुढाकाराने ही ऐतिहासिक बैठक पार पडली. सूत्रसंचालन अनिल दळवी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गणेश शिवलाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुशील कदम, भरत खांडे, रवी क्षीरसागर, मोहन मुंढे, कोंडिबा उजगरे, मितीन खेरुडकर, सुनील डाके, अविनाश तम्मेवार, श्रीधर क-हाळे, गजानन चव्हाण यांच्यासह अनेक न्यायालयीन कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:28
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20

Latest news