मयत शेतक-यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करा  

लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत मयत शेतक-यांच्या कर्जखात्यांची माहिती त्यांच्या कायदेशीर वारसांकडून घेऊन योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. संबंधित बँकांनी या कार्यप्रणालीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार ­विभागाचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत.
योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्जखात्यांमध्ये मयत शेतकरी असल्यास, त्याच्या वारसाची माहिती घेऊन कर्जखात्याचा वारस नोंदवावा. त्यानंतर पोर्टलवरील ‘वस्र’ङ्मं िऊीूीं२ी िअूूङ्म४ल्ल३२ सुविधेद्वारे वारसाची माहिती अपलोड करावी. बँकेने मयत शेतक-यांच्या वारसांचे हिस्से कर्जखात्यामध्ये नमूद करावेत. मयत शेतक-यांऐवजी वारस खातेदाराची माहिती नुमना तक्त्यात ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी. वारसांची माहिती भरताना अनु क्रमांक. इफ-कऊ, वारस क्रमांक, कायदेशीर वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, अ‍ॅ१्रर३ंू‘ फीॅ्र२३१८, उकऋ, बचत खाते क्रमांक, ढअउ कऊ, ढअउर टीेुी१२ँ्रस्र ठ४ेुी१, छङ्मंल्ल अूूङ्म४ल्ल३ ठ४ेुी१ आणि कर्जातील वारसाचा हिस्सा आदी माहिती देणे आवश्यक आहे.
एका इफ-कऊ अंतर्गत किमान एक आणि कमाल सहा कायदेशीर वारसांची नोंद करता येईल. प्रत्येक वारसाचा कर्जातील हिस्सा नोंदविणे आवश्यक आहे. सर्व वारसांच्या हिस्स्यांची एकूण बेरीज १०० टक्के असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी किंवा अधिक हिस्सा असल्यास प्रणाली नोंदणी स्वीकारणार नाही. माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित कर्जखात्याची आवश्यक तपासणी करावी. तसेच तक्रार निवारण स्थिती आणि ी-ङउ पडताळणीसह प्रणालीतील प्राथमिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. माहिती सादर केल्यानंतर शासन निर्णयातील निकषांनुसार स्वयंचलित छाननी केली जाईल. वारस आयकरदाता आहे किंवा नाही, तसेच तो शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाईल. निकषांनुसार अपात्र आढळणा-या वारसांना योजनेच्या लाभासाठी अपात्र घोषित केले जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित बँकांनी मयत शेतक-यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार आवश्यक कार्यवाही करून वारसांची माहिती पोर्टलवर अद्यावत करावी.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news