Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा मांजरा कारखाना संचालक मंडळातर्फे सत्कार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा मांजरा कारखाना संचालक मंडळातर्फे सत्कार

लातूर: प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा विद्यमान गळीत हंगाम २०२५-२६ दि. १७ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून ७ मार्चअखेर बंद झाला आहे. या कालावधीत कारखान्याने ऊस गळीत, साखर उत्पादन, इथेनॉल उत्पादन व वीज निर्मितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानिमित्ताने संचालक मंडळाच्या वतीने कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यमान गळीत हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासद व बिगर सभासदांचा मिळून एकूण १९,३६१.३३ हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होता. या हंगाम कालावधीत ७,१५,४०९.४३५ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून त्यातून ५,८८,५४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामात बी-हेवी व सिरपसह सरासरी साखर उतारा १२.३० टक्के इतका मिळाला असून, लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सध्या तरी सर्वाधिक उतारा मिळाला आहे. सदरचा उतारा व्हीएसआय यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावयाचा आहे. जिल्ह्यातील
काही कारखाने अजून सुरू आहेत.
कारखान्याच्या को-जनरेशन (वीज निर्मिती) प्रकल्पाने देखील चांगली कामगिरी केली आहे. ७ मार्च २०२६ अखेर या प्रकल्पातून ४,८८,११,००० केडब्ल्यूएच (युनिट्स) वीज उत्पादन झाले. त्यापैकी २,२६,०१,९५० केडब्ल्यूएच वीज कारखान्याने स्वत:  वापरली, तर २,६२,०९,०५० केडब्ल्यूएच वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पुरवठा करण्यात आली. तसेच कारखान्याच्या सोलार प्रकल्पातून ७ मार्च २०२६ अखेर ४,३५,६०६ केडब्ल्यूएच वीज निर्मिती झाली असून ती  पूर्णपणे कारखान्याच्या वापरासाठी उपयोगात आणण्यात आली आहे.
दरम्यान, अर्कशाळा (डिस्टिलरी) प्रकल्पात २२ नोव्हेंबर २०२५ पासून उत्पादन सुरू झाले असून ७ मार्च २०२६ अखेर १,२७,७९,७४१ लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे.  त्यापैकी ७८,४५,००० लिटर इथेनॉल विक्री करण्यात आलेली आहे. कारखान्याने विद्यमान गळीत हंगामात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा मिळवून  उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हे यश कारखान्याचे चेअरमन तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात  आली. या यशाबद्दल कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त  करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, शेती कमिटी अध्यक्ष कैलास पाटील, मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत उफाडे, धनराज  दाताळ, तात्­यासाहेब  देशमुख, भैरू कदम, सदाशिव कदम, निळकंठ  बचाटे, दयानंद बिडवे, विलास चामले, अरुण कापरे, शंकरराव  बोळंगे, अनिल दरकसे,  बालासाहेब पांढरे, श्रीकृष्ण काळे, सुरेश चव्हाण, शत्रूघ्न पाटील, तानाजी जाधव, कार्यकारी संचालक पंडित देसाई, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती  होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR