लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे. कारण खरीप पिके दुपार धरत असून, पिके संकटात सापडलेली असतानाच शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास लातूर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.
पावसाळ््यात प्रथमच आज पावसाळी वातावरण पाहायला मिळाले. लातूर शहरात सखल भागात पाणीच पाणी झाले असून, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, मागच्या ब-याच दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असताना लातूर परिसरात सायंकाळी ५ ते ६ दरम्यान दमदार पाऊस झाल्याने परिसरातील खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
















