मुंबई : प्रतिनिधी
‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ या महिलांची, महिलांद्वारा महिलांसाठी कार्यरत संस्थेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या आणि संस्थेच्या देशभरातल्या विविध शाखा, विभागांमधून आलेल्या हजारो सदस्य-भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेला भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालया अंतर्गत कार्यरत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल, विशेष अतिथि टिसर आर्टिझन्स ट्रस्टच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ मेघा फणसळकर, आयोगाचे आर्थिक सल्लागार जे. सरवणन (आयआरएस), योगेश भामरे, स्टॅट्युटरी ऑडिटर परेश डॉक्टर आणि अन्य अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली.
डॉ. मेघाताई फणसळकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, लिज्जत पापडची चव आपण सर्वांनी लहानपणापासून अनुभवली आहे, पापडाशिवाय आपले जेवण अपूर्ण वाटते. लिज्जतच्या अध्यक्षा स्वाती पराडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे मन:पूर्वक स्वागत करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. आयोगाकडून मिळणा-या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
















