वाचनामुळे माणूसपणाचे दर्शन घडते आणि मूल्य कळतात

किल्लारी : वार्ताहर
मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माणसाचा अमूल्य वेळ वाया जात आहे. तासनतास मोबाईलच्या वापरामुळे  वाचन संस्कृती अत्यंत कमी झाली आहे परंतु माणसाच्या जीवनात वाचनाला खूप महत्त्व आहे. वाचनामुळे माणसाला माणूसपणाचे दर्शन घडते समाज, राज्य व प्रशासन व्यवस्था, संस्कार आणि मानवी मूल्य कळतात म्हणून प्रत्येकाने काही ना काही वाचलेच पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांनी व्यक्त केले.
किल्लारी येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ कार्यक्रमात ते बोलत होते.  प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. पी. कांबळे यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप चव्हाण, ग्रंथपाल डॉ. व्ही. व्ही. गिरी, डॉ. ज्ञानदेव राऊत, डॉ. पांडुरंग मगर यांची उपस्थिती होती.
  प्रा.डॉ. गायकवाड यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विज्ञान, शिक्षण, इस्रो, डीआरडीओ आणि राष्ट्रनर्मितीत उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षण, वाचन आणि ज्ञान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते, असा संदेश प्रा. अशोक गायकवाड यांनी दिला. डॉ. कलाम यांचे जीवन आणि कार्य विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा देते, असेही त्यांनी नमूद केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय विकसित व्हावी.  विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी पुस्तकांचे वाचन करावे. हा या उपक्रमामागील उद्देश होता.
वाचन ही केवळ शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली नसून व्यक्तिमत्त्व विकासाचेही महत्त्वाचे साधन आहे. हा संदेश  प्रा.डॉ. अशोक गायकवाड यांनी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. डी. एन. भोयर यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संदीप चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक- प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
48:16
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47

Latest news