निलंगा : प्रतिनिधी
सहकार सप्ताहानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निलंगा मार्केट शाखेत बुधवारी (दि. १ जुलै) वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. बँकेचे संचालक अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष व्ही. जी. शिंदे, मार्केट कमिटीतील व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष व गटसचिव यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शाखा परिसरात विविध जातींच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास निश्चीतच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास निलंगा तालुका फिल्ड ऑफिसर संजय माने, शाखा व्यवस्थापक दत्ता होसुरे, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कमलाकर जाधव यांच्यासह गटसचिव पवार, मोरे, बालाजी मिटकरी, अनिल अग्रवाल, सिद्धू आवले, शिवाजी चव्हाण, भरत बियाणी, अशोक ढगे, मधुकर गाडीवान, दत्ता कोराळे, दीपक जाधव, परमेश्वर साठे, किशोर जाधव, विजय दाडगे, राजू मोरे, अर्जुन जाधव, प्रमोद ढेरे, विलास बोळे, बालाजी कांबळे तसेच बँकेचे कर्मचारी, अडत व्यापारी उपस्थित होते.
















