सेलुच्या निम्न दुधनात प्रकल्पात ४२ टक्के पाणीसाठा

 दिलीप डासाळकर
सेलू : तालुक्यातील वाकडी येथे असलेला निम्न दुधना प्रकल्प सेलू तालुक्यासह परभणी, जालना आणि नांदेड जिल्ह्याला वरदान ठरत आहे. या प्रकल्पात शनिवार, दि.२५ एप्रिल रोजी १०३.५७८ दलघमी. जिवंत पाणीसाठा असून मे महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सेलू तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सेलू तालुक्यात असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी क्षमता ४२३.६२० एवढी आहे. मागील पावसाळ्यात प्रकल्प जवळपास ८० टक्के भरला होता. तत्पूर्वी निम्न दुधना प्रकल्पातून मागील पावसाळ्यात दोन ते तीन वेळा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर निम्न दुधना प्रकल्पातून सेलू, परतुर, मंठा या गावांसह ९५ गावांना तसेच १०६ गाव पाणीपुरवठा अशा दोन पाणीपुरवठा योजनांना पिण्याचे पाणी प्रकल्पातून राखीव ठेवण्यात आलेले आहे. परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्याकरिता देखील काही पाणीसाठा राखीव ठेवण्यात आलेला आहे.  त्यानुसार या सर्व गावांसह बागेश्वरी कारखान्यासहित निम्न दुधना प्रकल्पातून दररोज जवळपास १ दलघमी एवढा पाणी वापर आहे. आजच्या स्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता मे अखेरपर्यंत पिण्यासाठी पुरेल अशी अपेक्षा आहे.

निम्न दुधना प्रकल्पातील एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास १५.७८ दलघमी एवढा पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. या प्रकल्पात एकूण जलसाठा २०६.१७८ दलघमी असून शनिवारी एकूण १०३.५७८ दलघमी अर्थात ४२.७७ एवढा पाणीसाठा असून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही अशी अपेक्षा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेस निम्न दुधना प्रकल्पामध्ये ३५.४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यावर्षीच्या जिवंत पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार नसल्याचे चित्र  आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

८.३२ मिलिमीटर बाष्पीभवन
या प्रकल्पात असलेल्या पाणीसाठ्याचे दररोज अंदाजे ८.३२ मिलिमीटर एवढे बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन गृहीत धरून सध्याचा पाणीसाठा पुरेसा आहे. तरी देखील शासन स्तरावरून पाणी वापर करताना योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्रकल्पातील बिगर सिंचन पाणी वापर ०.०३१० दलघमी एवढा आहे. हा प्रकल्प होण्यापूर्वी सेलू तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत होती. त्यामुळेच सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प परभणी जिल्ह्यासह जालना, नांदेड जिल्ह्याकरिता देखील वरदान ठरत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news