१०० पेक्षा जास्त मुला-मुलींचा पार्टीत सहभाग; पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा खुलासा

पुणे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील तुळापूर गावच्या हद्दीतील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. ज्यावेळी गुन्हे शाखेकडून हा छापा टाकण्यात आला, त्यावेळी तिथे १०० च्या जवळपास मुली-मुले उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे सर्व मुले-मुली नशेत होते. काही अल्पवयीन मुले देखील तिथे उपस्थित होते. दारूचा मोठा साठा देखील होता.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या पार्टीचे आयोजन केलेल्याची चौकशी केली जात आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून रेव्ह पार्टीचा मुद्दा तूफान चर्चेत आहे. घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे विविध पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. रेव्ह पार्टीच्या ठिकाणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

या रेव्ह पार्टीबद्दल तेजस्विनी सातपुते अप्पर पोलिस आयुक्त पुणे यांनी मोठी माहिती दिली. अप्पर पोलिस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी म्हटले की, लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरात मध्यरात्री पार्टी सुरू होती आणि यासाठी कोणतीही परवानगी न घेता ही पार्टी सुरू होती. यावेळी १००पेक्षा जास्त मुले आणि मुली उपस्थित होते. यामध्ये अनेक तरुण २१ वर्षाच्या आतील असल्याची संभावना वाटत आहे. ज्यांनी हा बंगला उपलब्ध करून दिला त्याचा यामध्ये काही संबंध आहे का? याबाबत पडताळणी होत आहे.

लाखो रुपयांचे मद्य येथे आढळून आले आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. येथे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा आढळून आला आहे. येथील पार्टीसाठी असलेले तरुण हे कोणत्या भागातून आले याचा तपास सुरू आहे. पार्टीत सहभागी झालेल्या मुला मुलींची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41

Latest news