अरुणाचलात भूस्खलन, ढगफुटी

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनाने मोठे नुकसान झाले असून, १४ गावांतील ३,१०० हून अधिक नागरिक या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. अचानक आलेल्या पुरात किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत.

पूराच्या पाण्यामुळे अनेक वाहने वाहून गेली असून डुकरे, कुक्कुटपालनातील पक्षी आणि इतर पाळीव जनावरांची मोठा बळी गेला आहे. रोहे गावातील मोठा भूभाग वाहून गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ग्रामस्थांना घरे सोडून शेतातील तात्पुरत्या झोपड्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. पूरामुळे गावाला जोडणारा झुलता पूल वाहून गेला असून, पाणीपुरवठा व्यवस्था, वीज खांब आणि विद्युत वाहिन्याही नष्ट झाल्या आहेत. जिल्हा प्रशासन, भारतीय सैन्य, भारत-तिबेट सीमा संघटना(बीआरओ), राज्य पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक यांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू आहे. रस्ते सुरू करणे, तात्पुरता पूल उभारणे, अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा पूर्ववत करणे, तसेच बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई व पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे.

ईशान्य भारताला मुसळधार पावसाचा तडाखा
ईशान्य भारतात सुरू असलेल्या मुसळधार मान्सून पावसामुळे आसाम, मेघालय, सिक्कीम आणि नागालँड या राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचविली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

५०० कुटुंबांचा संपर्क तुटला
जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी ऑगस्टी जमोह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारी-कोयू विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. तबिरिपो साकू, लोगलू, रोहे आणि कोयू या गावांसह अनेक भागांचा रस्ते संपर्क पूर्णपणे तुटला असून, सुमारे ५०० कुटुंबे बा जगापासून विलग झाली आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52

Latest news