काँग्रेस लढवय्या पक्ष!

मुंबई : प्रतिनिधी

बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका होती व कार्यकर्त्यांमध्येही दांडगा उत्साह होता म्हणूनच उमेदवार उभा केला होता पण महाराष्ट्राची राजकीय परंपरा, संस्कृती व सभ्यता लक्षात घेऊन सर्वांच्या विनंतीला मान देत दिवंगत नेते अजित पवार यांना आदरांजली देण्याच्या भावनेतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. बारामतीतून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेतला म्हणजे शेवट केलेला नाही तर हा आरंभ आहे असे स्पष्ट करत देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी जसा जवान लढतो तशाच पद्धतीने काँग्रेसचा कार्यकर्ते संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. आकाश मोरे यांच्यासह उमेदवारी मागितलेल्या इच्छुकांची, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. आपण घेतलेली भूमिका सोडत नाही, हा काँग्रेसचा बाणा आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना सपकाळ पुढे म्हणाले की, बारामतीची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला तेव्हा अनेक स्तरांतून काँग्रेसवर टीका करण्यात आली. बारामतीत काँग्रेस पक्षाला उमेदवार तरी मिळेल का? असा उपहास करण्यात आला पण याच बारामतीतून सहा उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, यातून अ‍ॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस विचार व पंजाचे चिन्ह घरोघरी पोहोचवणे ही त्यामागची भूमिका होती. काँग्रेस पक्षाचा विचार प्रतिकूल परिस्थितीतही टिकून आहे हे बारामतीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल करा ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे व या भूमिकेपासून आपण मागे हटलेलो नाही. अजित पवार यांचा पक्ष सत्तेत आहे पण महाराष्ट्रात गुन्हा मात्र दाखल करून घेतला जात नाही, परंतु काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा पाठपुरावाही केला जात आहे. अर्ज माघारी घेत असताना कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या घटनेचे पुढे काय झाले याची माहिती घेतली व आमदार रोहित पवार यांनीही त्यांची भेट घेतली यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news