कापून ठेवलेले कलिंगडामुळे मुलाचा मृत्यू

जांजगीर-चंपा : वृत्तसंस्था
छत्तीसगडमध्ये उन्हाळयाच्या सुट्टीचा आनंद लुटायला आलेल्या मुलांवर काळाने घाला घातला आहे. छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात कलिंगड आणि त्यानंतर चिकन खाल्यामुळे पाच मुलांना भीषण विषबाधा झाली. यामध्ये १५ वर्षांच्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून मुंबईतला पायधुनी प्रकरणाची आठवण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोडी दलहा येथील १५ वर्षीय अखिलेश धीवर आपल्या नातेवाईकांसह मामाच्या गावी एका लग्नासाठी आला होता. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मुलांनी घरात ठेवलेले कलिंगड खाल्ले. त्यानंतर रात्री त्यांनी चिकनही खाल्ले. मात्र, दोनच तासांत मुलांचा वेदनेने ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागल्या. अखिलेशसह श्री धीवर, पिंटू धीवर, नरेंद्र आणि हितेश धीवर या सर्वांना अचानक उलटया, जुलाब आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले, पण दुर्दैवाने अखिलेशने वाटेतच प्राण सोडले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कापलेले कलिंगड ठरले ‘विष’?
जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी जे कलिंगड खाल्ले ते सकाळीच कापून ठेवण्यात आले होते. अनेक तास कापून ठेवलेल्या फळांमध्ये विषाणूंचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. प्राथमिक दृष्टया हे प्रकरण फूड पॉयझनिंगचे दिसते. मुलांनी सकाळी कापलेले कलिंगड अनेक तासांनंतर खाल्ले आणि त्यानंतर इतर पदार्थही खाल्ले, ज्यामुळे संसर्ग बळावला असावा, असे डॉक्टरांनी सांगितले. प्रशासनाने व्हिसेरा नमुने आणि कलिंगड लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत.

मुंबईतील घटनेची आठवण
छत्तीसगडमधील या घटनेने काही काळापूर्वी मुंबईत घडलेल्या अशाच एका धक्कादायक घटनेची आठवण करून दिली आहे. मुंबईतही एका कुटुंबाने कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news