Homeमनोरंजनरणवीर सिंह महादेवाच्या भूमिकेत दिसणार नाही; अखेर चर्चांना पूर्णविराम!

रणवीर सिंह महादेवाच्या भूमिकेत दिसणार नाही; अखेर चर्चांना पूर्णविराम!

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता रणवीर सिंह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्याच्या भूमिकेचे आणि अभिनयाचे चाहत्यांनी जोरदार कौतुक केले. ‘धुरंधर’च्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंह कोणता चित्रपट करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. रणवीर ‘हमजा अली मजारी’ या दमदार भूमिकेनंतर भगवान महादेवाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

लेखक अमिश त्रिपाठी यांच्या ‘शिवा ट्रिलॉजी’वर आधारित पुस्तकावर भव्य चित्रपट, मालिका तयार होत असून, त्यामध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असल्याची चर्चा होती. मात्र, अमिश त्रिपाठी यांनी यावर भाष्य करीत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

लेखक अमिश त्रिपाठी यांच्या ‘शिवा ट्रिलॉजी’ मालिकेवर आधारित चित्रपटात रणवीर भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, अमिश यांनी मंगळवारी हे दावे फेटाळून लावले आणि अमित त्रिपाठी यांनी स्पष्ट केले की, अभिनेता रणवीर सिंह या प्रकल्पाशी जोडलेला नाही. त्यामुळे अभिनेता रणवीर हा भगवान महादेवाची भूमिका साकारणार नसल्याचे स्पष्ट झाले. हा त्याच्या चाहत्यांसाठी धक्का असला तरी लेखक अमिश त्रिपाठी यांनी स्पष्टीकरण देत चर्चा थांबवल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR