तेजस ठाकरे यांनी शोधली गोगलगायीची नवी प्रजात

कोल्हापूर : प्रतिनिधी
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे प्रमुख संशोधक तेजस ठाकरे आणि त्यांच्या ग्रुपने पुन्हा एकदा पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या खजिन्यात मोलाची भर घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील निमसदाहरित जंगलामध्ये त्यांनी केसाळ गोगलगायींच्या एका नवीन प्रजातीचा यशस्वीरित्या शोध लावला आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे या लहान प्रजातींच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे.

गोगलगायीच्या या नवीन प्रजातीचे शास्त्रीय नामकरण प्रसिद्ध जपानी अ‍ॅनिमेटर आणि स्टुडिओ घिबलीमधील सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या नावावरून ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ असे करण्यात आले आहे. मियाझाकी यांच्या चित्रपटांत निसर्गाचे महत्त्व सुंदरपणे दर्शविले जाते. त्या तत्त्वज्ञानाला आदरांजली म्हणून हे नामकरण करण्यात आले आहे. त्यांचा हा रिसर्च ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मॅग्झिनमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

‘लहान गोगलगायी निसर्गाचा अनमोल ठेवा आहेत आणि त्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. गोगलगायींसारख्या आकाराने लहान प्रजाती संशोधनाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिल्या आहेत. भविष्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा प्रजातींच्या संशोधनावर भर दिला जाईल, अशी प्रतिक्रिया तेजस ठाकरे यांनी दिली.

अनेक दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचा शोध
दरम्यान ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही अनेक दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचा शोध लावला आहे. याद्वारे त्यांनी याला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या टीमने सापाची नवीन प्रजाती शोधली होती. पश्चिम घाटात त्यांनी ‘सह्याद्रीओफिस उत्तरघाटी’ या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला होता. संस्कृत ‘सह्याद्री’ आणि ग्रीक ‘ओफिस’ (साप) या शब्दांवरून हे नामकरण करण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56

Latest news