22.1 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeराष्ट्रीय‘दृष्यम’ पाहून विवाहित प्रेयसीची हत्या

‘दृष्यम’ पाहून विवाहित प्रेयसीची हत्या

जिल्हा न्याय दंडाधिका-यांच्या घराबाहेर पुरला मृतदेह

कानपूर : वृत्तसंस्था
कानपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेली उद्योगपती राहुल गुप्ता यांची पत्नी एकताच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी एका जीम ट्रेनरला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जूनची आहे. आरोपीची ओळख ग्रीन पार्क परिसरातील निवासी जीम ट्रेनर विमल सोनी अशी झाली आहे. पोलिसांनी त्याला शनिवारी बेड्या ठोकल्याा. विमल हाय प्रोफाईल ट्रेनर आहे, जो अनेक अधिका-यांनाही प्रशिक्षण देतो.

पोलिसांना या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यानंतर पीडित महिला आरोपीचे लग्न ठरल्याने नाराज होती. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून त्याने महिलेची हत्या केली. आरोपीने महिलेचा मृतदेह कानपूरच्या जिल्हा न्याय दंडाधिका-यांच्या बंगल्यातील परिसरात पुरला होता.

डीसीपी श्रवण कुमार सिंह यांनी सांगितले की, २४ जून रोजी ही घटना घडली आहे. पीडित महिला आरोपीच्या जीममध्ये ट्रेनिंगला जात असे. आरोपीचे लग्न ठरले असल्याने ती कथितपणे नाराज होती. यामुळेच आरोपीशी तिचा मोठा वाद झाला होता .

त्यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी पीडित महिला जवळपास २० दिवसांनी जिमला आली होती. ट्रेनर तिला कारमधून घेऊन गेला होता. कारमध्ये दोघांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी आरोपीने पीडितेच्या गळ्यावर जोरात बुक्की मारली, ज्यानंतर ती बेशुद्ध पडली.

मृतदेह पुरण्यासाठी खोदला खड्डा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिची हत्या केली आणि मृतदेह पुरून टाकला. महिलेचा मृतदेह पुरण्यासाठी त्याने एक खड्डा खोदला होता असेही पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीने आपण अनेकदा ‘दृष्यम’ चित्रपट पाहिला होता. यामुळे न्याय दंडाधिका-यांच्या परिसरात मृतदेह पुरला असेही त्याने सांगितले.

आरोपीने मोबाईल वापरलाच नाही
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना फार मेहनत घ्यावी लागली. याचे कारण हत्येदरम्यान आरोपी मोबाईलचा वापरच करत नव्हता. यामुळे त्याची माहिती मिळवताना पोलसांना फार प्रयत्न करावे लागले. पोलिस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी एकताचा मृतदेह मिळवला आहे. त्याचा पूर्ण सांगाडा झाला आहे. तीन तास खोदकाम केल्यानंतर मृतदेह सापडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR