पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा

लातूर : प्रतिनिधी
जुलै महिण्याचा पहिला आठवडा संपत आला तरी लातूर जिल्हयात अद्याप पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नाही. शिरूर अनंतपाळ तालुका वगळता इतर तालुक्यात पेरणी योग्य पाऊस पडलेल्या क्षेत्रावर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्हयात आजपर्यंत ९.१० टक्के म्हणजेच ५३ हजार ३२८ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाल्या आहेत. जिल्हयात खरीपाच्या पेरण्या होण्यासाठी दमदार पावसाची शेतक-यांना प्रतिक्षा आहे.
जून महिना संपून जुलै महिण्याचा पहिला आठवडा संपत आला आहे. तरीही यावर्षी जिल्हयात मान्सूनचा दमदार पाऊस झाली नाही. जिल्हयात जळकोट तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तर इतर तालुक्यात पेरणी योग्य पाऊस अद्याप न झाल्याने त्या परिसरातील शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्हयात आज पर्यंत १०५.९ मिली मिटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यानुसार ५३ हजार ३२८ हेक्टरवर पेरा झाला आहे. यात ३७ हजार ७०३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. ७ हजार ९९० हेक्टरवर तूर, ८६१ हेक्टरवर मूग, ५७० हेक्टरवर उडीद, १६४ हेक्टरवर ज्वारी, १८ हेक्टरवर मका, तीळाची ८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर कापसाची ६ हजार ७ हेक्टरवर लागवड झाली आहे.
जिल्ह्यात ९.१० टक्के झाल्या पेरण्या
यावर्षी जिल्हयात ५ लाख ९५ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. जिल्हयात आजपर्यंत ९.१० टक्के ५३ हजार ३२८ हेक्टरवर पेरा झाला आहे. यात जळकोट तालुक्यात ६९.४८ टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. तर उदगीर तालुक्यात १७.१७ टक्के, अहमदपूर तालुक्यात २०.३८, रेणापूर तालुक्यात ५.६७ टक्के, निलंगा तालुक्यात१.०६ टक्के, देवणी तालुक्यात १.८७ टक्के, औसा तालुक्यात ०.५५ टक्के, लातूर तालुक्यात ३.४६ टक्के, चाकूर तालुक्यात २.०३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात अद्याप पेरणी झाली नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03

Latest news