शाळा, कॉलेज परिसरात स्टिंगबंदी

५०० मीटरच्या परिघात एनर्जी ड्रिंक विक्रीवर प्रतिबंध, झिरवाळ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
शाळा आणि महाविद्यालयांच्या ५०० मीटरच्या परिघात ‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’च्या विक्रीस बंदी घालण्यात आली असून त्याबाबत शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले. पेयांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही झिरवाळ म्हणाले.

स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर होणा-या दुष्परिणामांबाबत आमदार विक्रम पाचपुते आणि राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या स्टिंगची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येते. सोशल मीडियाद्वारेही याचा प्रसार होत असतो. मात्र, स्टिंगच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, पाथर्डी येथे मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून शासन यावर निर्बंध आणणार का, अशी विचारणा विक्रम पाचपुते यांनी केली. स्टिंग एनर्जी ड्रिंकमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवणारे कॅफिन, अतिप्रमाणातील साखर आणि कृत्रिम रंग यांसारखी घातक रसायने व घटक किती प्रमाणात आढळतात, याची अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसआय) तपासणी केली आहे काय, असाही प्रश्न पाचपुते यांनी केला.

शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या पेयाच्या अतिसेवनामुळे हृदयविकार, निद्रानाश, किडनीचे आजार आणि अलीकडेच काही विद्यार्थी, तरुणांचा मृत्यूही झाल्याच्या घटना समोर आल्या असल्याची बाब विक्रम पाचपुते यांनी या वेळी निदर्शनास आणली. त्यामुळे या पेयाच्या बाटलीवर ‘लहान मुलांसाठी शिफारस केलेली नाही’, असा इशारा असूनही शाळा-कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये व कॅम्पस परिसरात याची विक्री केली जात आहे. यावर पूर्ण बंदी घालण्यासाठी आणि याच्या जाहिरातींवर निर्बंध आणण्यात यावेत, अशी मागणी पाचपुते यांनी केली. त्यावर या पेयाच्या बाटलीवर गरोदर महिला किंवा स्तनदा माता, लहान मुले आणि कॅफिनची अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्ती यांच्यासाठी अयोग्य, असे स्पष्ट अक्षरात लिहिण्याचे बंधनकारक करण्यात आले असून शाळांच्या ५०० मीटरच्या परिघात या पेयाच्या विक्रीला बंदी घालण्यात येणार असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

आता एनर्जी ड्रिंक
उल्लेखावर बंदी
बाजारात जे काही सो कॉल्ड एनर्जी डिंक्स येतात, त्यांच्या कंपन्यांना एनर्जी ड्रिंक्स हा शब्द लिहिता येत नाही. ३० जून रोजी याबाबत त्यांना नोटीस काढण्यात आली आहे. अशा १०-१२ कंपन्या आहेत. यात पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता एनर्जी ड्रिंकचा उल्लेख बंद होईल, असे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितले.

दूध सम्राटांना वॉर्निंग
तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून कारवाईचा धडाका सुरु केला आहे. आता त्यांनी आपला मोर्चा दूध सम्राटांकडे वळवली असून, त्यासाठी सेव्ह फूड, सेव्ह ड्रग ही मोहीम हाती घेतली आहे. आता दूध सीलबंद असेल तरच घ्या, असे मुंढे म्हणाले. त्यामुळे सुटे दूध विकता येणार नाही. घ्यायचेच असेल तर शेतकरी आहे का, ते तपासा, असेही ते म्हणाले.

हॉटेलचालकांना इशारा
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पेस्ट कंट्रोल केले असे सर्टीफिकेट दाखविले जाते. मात्र, प्रत्यक्षात काही हॉटेलमध्ये पेस्ट कन्ट्रोल केले गेले नाही. त्यामुळे त्यांचे लायसन्स रद्द करण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे कागदी घोडे नाचवणा-यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, असे मुंढे म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news