लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनच्या लातूर परिमंडळाची सन २०२६-२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड उत्साहात पार पडली. या निवडणुकीत सर्व पदाधिका-यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी देविदास सुरवसे, उपाध्यक्ष संतोष सांगोळे (बीड) व मनोज पेटकर (लातूर), कार्याध्यक्षपदी आनंद गंजी, सचिव अजित जैन (लातूर), तर सहसचिव सतीश जावळेकर (लातूर), महेश चव्हाण (धाराशिव) आणि शरद गदळे (बीड),
कोषाध्यक्ष गजानन लवराळे (लातूर), महिला प्रतिनिधी सविता पवार (बीड), प्रसिद्धीप्रमुख धनंजय पवार (लातूर), विधी सल्लागार अॅड. चेडे, सल्लागार चेतन वाघ (लातूर) आणि जिालिंदर मंगळवेढेकर (लातूर) यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेचे कामकाज सहाय्यक महाव्यवस्थापक चेतन वाघ व वरिष्ठ व्यवस्थापक जालींदर मंगळवेढेकर तसेच उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर यांनी पाहिले. नवीन कार्यकारिणीवर अधिकारी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिका-यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
















