औसा (प्रतिनिधी )
येथील सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांचे हैदराबाद येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता औसा येथील पाराबाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात गोरखनाथ महाराज, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज, सदगुरु गुरुबाबा महाराज, बसवंतराय देशमुख महाराज, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लिलाबाई महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजतात संस्थानचे सर्व शिष्य, भाविक, भक्त गणात शोककळा पसरली.
















