मुंबईत सुटे दूध ९ रुपयांनी महागले!

पॉकेटबंदचे दर जैसे थे
मुंबई : प्रतिनिधी
सणासुदीच्या तोंडावर मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर महागाईचा मोठा फटका बसणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत सुट्या दुधाचा घाऊक दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. हे नवे दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील. त्यानंतर पुन्हा एकदा याचा आढावा घेतला जाणार आहे. हे घाऊक दर असल्याने किरकोळ बाजारात ग्राहकांना स्थानिक विक्रेते आणि वाहतूक खर्चानुसार दुधासाठी अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे.

पॅकेटबंद दुधाच्या दरांवर या वाढीचा थेट परिणाम होणार नाही. अमूल किंवा मदर डेअरी यांसारख्या कंपन्या आपापल्या उत्पादन खर्चानुसार किरकोळ दर ठरवतील. दाणा, तूरचुणी, चणाचुणी, चारा आणि पेंड यासारख्या पशुखाद्याच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तसेच दुधाळ जनावरांच्या खरेदीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. याशिवाय शुद्ध दुधाची मागणी वाढली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी या दरवाढीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, भेसळ रोखल्याने निर्माण झालेल्या तुटवड्याचा गैरफायदा घेत खाजगी डेअरींची मनमानी सुरू झाली आहे. आरे किंवा महानंदासारख्या सरकारी डेअरी पूर्ण क्षमतेने सुरू असत्या तर ही मनमानी झाली नसती.

सणासुदीत ग्राहकांच्या
खिशाला लागणार कात्री
सप्टेंबर महिन्यापासून गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यांसारखे मोठे सण सुरू होत आहेत. या काळात दूध, दही, खवा, तूप आणि मिठाईची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम सणांच्या बजेटवर होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news