मुंबई महानगरपालिकेत महागड्या गाड्यांसाठी पैशांची उधळपट्टी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महागर पालिकेतील उधळपट्टीचा नवीन प्रकार समोर आलाय. महापालिकेतील पदाधिका-यांना स्कॉर्पिओऐवजी आता इनोव्हा क्रिस्टा हवीय. कारण काय तर स्कॉर्पिओ एन गाड्यांमधून प्रवास करताना धक्के बसतात, पाठ दुखते. त्यामुळेच या पदाधिका-यांनी इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी केली. त्यानुसार उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि ३ समिती अध्यक्षांसाठी २५ लाखांच्या इनोव्हा गाड्या मागवण्यात आल्या आहेत.

हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. महापालिकेत नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना प्रशासनाकडून वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची ‘इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड’ गाडी देण्यात आली आहे. तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी ‘स्कॉर्पिओ एन’ वाहने देण्यात आली आहेत. मात्र, देण्यात आलेली ‘स्कॉर्पिओ एन’ ही गाडी प्रवासासाठी सोयीची वाटत नसल्याची थेट तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे. त्यामुळे आता सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी पुन्हा नव्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाड्या खरेदी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई महापालिकेने महापौर-उपमहापौर त्यासोबतच विरोधी पक्षनेते, सभागृहनेते त्यासोबत विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी महापालिका महापौर निवडणूक होण्याआधी फेब्रुवारी महिन्यात तेरा गाड्यांची खरेदी केली होती… ही प्रक्रिया प्रशासकीय राजवट असताना पार पडली. ज्यामध्ये महापौरांसाठी एक इनोव्हा हाय क्रॉस हायब्रीड गाडी व इतर उपमहापौर सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी १२ स्कॉर्पिओ एन गाड्यांची खरेदी करण्यात आली. इनोव्हाची किंमत ३० लाख रुपये, तर एका स्कॉर्पिओची किंमत १८ लाख रुपये आहे, असा एकूण दोन कोटी १६ लाख रुपये खर्च या वाहनांवर करण्यात आला.

सहा महिन्यांपूर्वीच केला होता २ कोटी १६ लाखांचा खर्च!
विशेष म्हणजे, महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना निवडणूक होण्यापूर्वी म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पदाधिका-यांसाठी १३ नवीन वाहनांची खरेदी केली होती. या १३ वाहनांवर महापालिकेने तब्बल २ कोटी १६ लाख रुपये खर्च केले होते. महापालिकेत गेल्या पावणेचार वर्षांपासून नगरसेवक आणि अध्यक्ष नसल्यामुळे पूर्वीची वाहने अधिकारी वापरत होते. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर महापालिकेत नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची वर्दळ वाढल्याने पदाधिका-यांसाठी ही नवी वाहने खरेदी करण्यात आली होती.

जनतेच्या पैशांची उधळपट्टी?
अवघ्या ६ महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या ‘स्कॉर्पिओ एन’ गाड्या बाजूला सारून पुन्हा महागड्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाड्यांची मागणी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा नव्या गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला जात असल्याने महापालिकेच्या या उधळपट्टीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

किशोरी पेडणेकरांचा संताप
या प्रकरणी बोलताना माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मी यावरून दोन-तीन गोष्टींवर प्रकाश टाकेन. यामध्ये ५४ गाड्या घेतल्या. काही गाड्या वॉर्ड अध्यक्ष यांना दिल्या. आयुक्त यांना देखील यातील गाड्या दिल्या आहेत. आम्हाला ज्या गाड्या दिल्या तिचे अ‍ॅव्हरेज ७-८आहे. गाडी बरोबर नाही, पाठ दुखते असे काहीजण म्हणतायत. गाडी मुंबईच्या बाहेर न्यायची असते तेव्हा आयुक्तांची परवानगी लागते. मी महापौर असताना दोन वेळा गाडी बाहेर घेऊन गेले होते, आताही मी बाहेर गाडी घेऊन जात नाही. अशा पद्धतीने पालिकेची लूटमार करत असतील तर योग्य नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news