Homeमहाराष्ट्ररुपाली चाकणकर ‘एसआयटी’समोर हजर

रुपाली चाकणकर ‘एसआयटी’समोर हजर

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आज रविवार, १० मे रोजी नाशकात एसआयटी चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांना माध्यमांनी गराडा घातला. पण त्यांनी सर्वांच्या प्रश्नांना अगदी शांतपणे उत्तरे दिली. याप्रकरणात त्यांच्यावर जे काही आरोप होत आहेत त्याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. भोंदू अशोक खरात संबंधित प्रश्नाची उत्तरेही त्यांनी दिली.

रुपाली चाकणकर या एसआयटी चौकशीसाठी नाशकात दाखल झाल्या असता त्यांनी माध्यमांना खरातविषयी एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्यासंदर्भात त्यांचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आज मी आली आहे. या तपासात पूर्णपणे माझे सहकार्य असेल. तपासाला सामोरे जात असल्याने मदत तपास अधिका-यांना, पोलिसांना करेल. त्यांच्या प्रश्नांना निश्चितपणे उत्तर देईल, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले. एसआयटी तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

भोंदू अशोक खरात यांच्याशी संबंधावर आणि आरोपावरही त्यांनी उत्तर दिले. मला असे वाटते की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल, त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. तर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची आपल्याला कल्पना नाही असे चाकणकर म्हणाल्या.

रुपाली चाकणकर या भोंदू अशोक खरात याला गुरू मानत होत्या. त्यांचे खरातसोबतचे काही फोटोही समोर आले. त्यात त्या पाद्यपूजा करतानाचाही फोटो होता. तर याप्रकरणात काहूर उठल्यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR