विरोधी पक्षनेत्यांकडून फडणवीसांना शुभेच्छा

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आज शपथ घेणार आहेत. महायुतीला राज्यात विक्रमी बहुमत मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजप गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. तिस-यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी त्यांनी मराठवाड्यासाठी दहा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

मराठवाडा हा महाराष्ट्रातील मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. येथील पर्जन्यस्थिती राज्यातील इतर पाच विभागांच्या तुलनेत वाईट आहे. त्यासोबतच औद्योगीकरण देखील मोठ्या प्रमाणात नाही. यामुळे येथील तरुणांना शिक्षण आणि रोजगारासाठी पुणे, मुंबईला जावे लागते. या सर्व पार्श्वभूमींचा विचार करून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे होऊ घातलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना मराठवाड्याच्या विकासाबद्दलच्या १० मागण्या केल्या आहेत.

जायकवाडी धरणाच्या कालव्यांची जलवहन क्षमता निम्म्यापेक्षा खाली गेली आहे. या कालव्यांचे पुनरुज्जीवन करून पाण्याची गळती शून्यावर आणत नासाडी रोखावी, पाटबंधारे विभागात रिक्त असलेल्या पदांची सरळ भरती करून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, छत्रपती संभाजीनगर-नगर-पुणे अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड महामार्ग केवळ कागदावर नको, तो प्रत्यक्षात यावा. संभाजीनगर-नगर-पुणे या विद्यमान मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दुमजली रस्तेनिर्मिती व्हायला हवी.

जालना- नांदेड दरम्यान अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड महामार्ग निर्मितीच्या कामाचा आरंभ आणि त्याचे लोकार्पण विद्युतगतीने व्हायला हवे. ऑरिक-बिडकीनच्या दुस-या टप्प्याचे भूमि अधिग्रहण आणि किमान दीड लाख कोटींची गुंतवणूक मराठवाड्यात द्यावी. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपल्या आश्वासनाप्रमाणे ‘तीन महिन्यांत’ शहरवासीयांना दररोज पाणी द्या. मराठवाड्यात बोटावर मोजण्याइतकी शहरे उरली आहेत जिथे नागरिकांना दरदिवशी पाणी मिळते. मराठवाड्यातील तमाम शहरांच्या पाणीप्रश्नावर तातडीने उपायोजना हव्यात आणि कालबा पाणीपुरवठा योजना बाद करून नागरिकांना दरदिवशी पाणी देण्याची तजवीज करावी.

पर्यटकांची वाढती संख्या पाहता छत्रपती संभाजीनगरला उदयपूर, बोधगया आदी ठिकाणांशी जोडण्याकरिता विमानांची अधिक उड्डाणे द्या. घृष्णेश्वर, परळी आणि औंढा नागनाथ ही ज्योतिर्लिंगे महाराष्ट्राचाच भाग आहेत. देशातील अन्य ज्योतिर्लिंग मंदिरांच्या धर्तीवर इथेही विशेष निधी देऊन विकासकामे हाती घ्यावीत. विदर्भातील ‘मिहान’च्या शिष्टमंडळाने मराठवाड्यातील उद्योजकांना इथे येऊन स्थलांतराच्या नावाखाली प्रलोभने देऊ नयेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news