संसदेचे गुरुवारपासून विशेष अधिवेशन

३ दिवस अधिवेशन, पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विधेयक मांडणार
विरोधी पक्षांचा वाढीव जागा, मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे विशेष अधिवेशन गुरुवार, दि. १६ ते १८ एप्रिलदरम्यान होत असून, पहिल्याच दिवशी अधिवेशनात
महिला आरक्षण विधेयक मांडले जाणार असून, पहिल्याच दिवशी संसदेत नारीशक्ती वंदन सुधारणा अधिनियम, सीमांकन विधेयकासह ३ विधेयके मांडली जाणार आहेत. यात नारीशक्ती वंदन सुधारणा अधिनियम आणि सीमांकन विधेयकाबाबत सत्ताधारी विरोधकांत एकमत झालेले नाही. त्यामुळे यावरून सत्ताधारी-विरोधकांत चांगलीच जुंपणार आहे. कारण विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना, लोकसभेच्या वाढीव जागांना विरोध केला. त्यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठबळ दिले. परंतु लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित सीमांकन विधेयकाला विरोधकांनी विरोध केला असून, या विधेयकाच्या विरोधात मतदान करून आम्ही विरोध करू, असे कॉंग्रेस नेते म्हणाले. २०२९ पासून वाढीव जागांसह महिला आरक्षण लागू करण्यात येणार असल्याने आवश्यक ती कायद्यात दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने हे विशेष अधिवेशन महत्त्वाचे असल्याचे सत्ताधा-यांचे म्हणणे आहे. महिला आरक्षण कायदा लागू करण्यासाठी लोकसभेच्या जागांची संख्या ८५० पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. यातील २७३ जागा महिलांसाठी आरक्षित असतील. त्यामुळे लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे.
सध्या लोकसभेत ५४३ जागा आहेत. विरोधी पक्षांनी एवढ्या जागांमध्येच महिलांना आरक्षण द्यावे, असे म्हटले. परंतु एनडीएने जागा वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्याचे ठरवले आहे.

सरकार १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात २०२९ पासून लोकसभेत ३३% महिला आरक्षण लागू करण्यासाठी संविधान दुरुस्ती विधेयक आणत आहे. पंतप्रधान मोदी १७ एप्रिल रोजी चर्चेला उत्तर देऊ शकतात. हे बदल २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून लागू करण्याची योजना आहे. मात्र, यावर विरोधही सुरू आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सांगितले की, दक्षिणेकडील राज्यांना जागा वाढवणे मान्य नाही. त्यामुळे यावरून वाद उफाळण्याची शक्यता आहे.

सध्या लोकसभेत ५४३ जागा आहेत. सरकार १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात २०२९ पासून लोकसभेत ३३% महिला आरक्षण लागू करण्यासाठी संविधान दुरुस्ती विधेयक आणण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान मोदी १७ एप्रिल रोजी चर्चेला उत्तर देऊ शकतात. हे बदल २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून लागू करण्याची योजना आहे. मात्र, यावर विरोधही सुरू झाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सांगितले की, दक्षिणेकडील राज्यांना जागा वाढवणे मान्य नाही. विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही हीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

पक्ष आरक्षणाच्या विरोधात
नाही; कॉंग्रेस अध्यक्ष खरगे
काँग्रेस महिला आरक्षणाच्या विरोधात नाही. सरकार राजकीय कारणांमुळे ते पुढे रेटत आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली चुकीचे सीमांकन (डिलिमिटेशन) आणले जात आहे. हे संघराज्यीय संरचनेच्या विरोधात आहे, असे केसी वेणुगोपाल म्हणाले. सीमांकनापूर्वी (डिलिमिटेशन) सर्व राज्ये आणि पक्षांशी चर्चा व्हायला हवी, असे शशी थरूर म्हणाले.

२०२९ ची सरकारची
तयारी : सिब्बल
सरकार हे सर्व २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्याच्या उद्देशाने करत आहे. जर सरकारला महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यायचे असेल तर ते सध्याच्या ५४३ जागांमध्येच लागू केले जाऊ शकते. जागांच्या पुनर्वितरणामुळे उत्तर भारताला जास्त फायदा होईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news